• Download App
    सत्तेसाठी खेचाखेची की राष्ट्रवादीतील फूट "झाकण्या"साठी पुण्यात काका - पुतण्याच्या "गुप्त" गाठीभेटी??|Sharad pawar - ajit pawar meeting in pune, to cover up the split in NCP

    सत्तेसाठी खेचाखेची की राष्ट्रवादीतील फूट “झाकण्या”साठी पुण्यात काका – पुतण्याच्या “गुप्त” गाठीभेटी??

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका पुतण्यांची “गुप्त” भेट पुण्यात एका उद्योगपतीच्या बंगल्यावर झाली. मात्र या भेटीची अधिकृत माहिती दोघांनीही दिली नाही. त्यामुळे ही भेट सत्तेच्या वळचणीसाठी झाली की राष्ट्रवादीतील खरी फूट झाकण्यासाठी घडली??, असा सवाल तयार झाला आहे.Sharad pawar – ajit pawar meeting in pune, to cover up the split in NCP

    पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क मधल्या बंगल्यात झाल्याची बातमी मराठी माध्यमांनी काही व्हिजुअल सह दिली. त्यामध्ये माध्यमांच्या नजरेत येऊ नये म्हणून अजित पवार स्वतःच्याच गाडीत झोपून गेले, अशी बातमीही काही माध्यमांनी चालवली. पण सर्वच माध्यमांनी पवार काका – पुतण्याच्या भेटीच्या बातम्या दिल्यामुळे ती भेट “गुप्त” उरली नाही. या भेटीगाठी संदर्भात दोन्ही नेत्यांनी अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे मराठी माध्यमांच्या अटकळींना उत आला.



    या बैठकीत जयंत पाटील सामील झाल्याचेही सांगण्यात आले. जयंत पाटलांसाठी शिंदे – फडणवीस सरकार मधले राष्ट्रवादीच्या कोट्यातले दहावे मंत्री पद रिकामे आहे. त्यांना भाजपमध्ये सामील करून किंवा ते राष्ट्रवादीत येऊन राज्यातल्या जलसंपदा मंत्रीपद दिले जाईल, असा निरोप म्हणे अजित पवारांनी शरद पवारांना दिला. पण पवारांनी आपण भाजप बरोबर अधिकृतपणे बिलकुल जाणार नाही, असे अजित पवारांसमोर स्पष्ट केले. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी देखील शरद पवारांची बाजू सोडून अजित पवारांच्या गोटात दाखल व्हायला नकार दिल्याचे मराठी माध्यमांचे म्हणणे आहे.

    पण या सगळ्यात सत्तेच्या वळचणीसाठी खेचाखेची सुरू आहे आणि राष्ट्रवादीतील फूट खऱ्या अर्थाने उघड होऊ नये म्हणून झाकायची आहे यासाठी भेटीगाठी सुरू आहेत हे मात्र कोणी सांगितले नाही.

    जयंत पाटील अजित पवारांच्या गोटात किंवा भाजपमध्ये गेले तरी त्यांना भाजपच्या अटी शर्तीनुसार फार तर जलसंपदा खाते मिळेल. त्यापलीकडे काही नाही. तसेच सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल त्या पलीकडे काही मिळणार नाही. पण या तडजोडीमुळे विरोधकांमधली पवारांची विश्वासार्हता पूर्ण आणि कायमची संपुष्टात येईल, याचा “धोका” पवारांना वाटतो आणि आपल्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस तो “धोका” पत्करण्याची किमान “उघड” तयारी तरी पवार दाखवत नाहीत, असे आजच्या भेटीतून दिसून आले.

    त्यामुळे अधिकृतपणे पवार भाजपच्या बरोबर जाणार नाहीत असे पवार गोटातून अजितदादांना स्पष्ट बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी यातला “अधिकृत” हा शब्द फार महत्त्वाचा आहे. याचा अर्थ अनधिकृतपणे पवार भाजपची बाजू त्यांच्या नेहमीच्या राजकारणानुसार उचलून धरू शकतात, असाच होतो.

    त्याचबरोबर राष्ट्रवादीत अधिकृत रीत्या फूट पडल्याचे दाखवून आपल्या लोकप्रतिनिधींची संख्या घटविणे दोन्ही गटांना परवडणार नसल्याने अजूनही नेमके कोणते आमदार आणि खासदार कोणाकडे आहेत, हे शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी दोन्ही नेत्यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे. निवडणूक आयोगाने या दोन्ही नेत्यांना नोटीसा बजावल्याने त्यांना अधिकृतरित्या कायदेशीर पातळीवर उत्तरे द्यावी लागणार आहेत आणि त्या उत्तरांमधूनच राष्ट्रवादीत खरी फूट पडली की नाही हे उघडपणे दिसून येणार आहे. या पार्श्वभूमीवर देखील ही “गुप्त” न राहिलेली भेट अतुल चोरडिया यांच्या घरी झाल्याचे मानण्यात येत आहे.

    Sharad pawar – ajit pawar meeting in pune, to cover up the split in NCP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस