• Download App
    Sharad Pawar Birthday : वाढदिवशी पवारांनी सांगितली कृषिमंत्री असतानाची आठवण, म्हणाले- फुले-आंबेडकरांचे पुतळे महाराष्ट्रापेक्षा यूपी- बिहारमध्ये जास्त । Sharad Pawar Address To NCP Party Workers On His 81st Birthday

    Sharad Pawar Birthday : वाढदिवशी पवारांनी सांगितली कृषिमंत्री असतानाची आठवण, म्हणाले- बांधिलकी असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य

    राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 81वा वाढदिवस आहे. यानिमित्त राष्ट्रवादीतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवारांनी देशातील परिस्थिती व त्यांची भूमिका यावर भाष्य केले आहे. Sharad Pawar Address To NCP Party Workers On His 81st Birthday


    वृत्तसंस्था

    पुणे : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 81वा वाढदिवस आहे. यानिमित्त राष्ट्रवादीतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवारांनी देशातील परिस्थिती व त्यांची भूमिका यावर भाष्य केले आहे.

    पवार म्हणाले की, देशासमोर आज अनेक प्रश्न आहेत, त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटक देशाचा चेहरामोहरा बदलू शकतो. यानंतर त्यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून महाराष्ट्रापेक्षा या महापुरुषांच्या पुतळे बिहार आणि उत्तर प्रदेशात जास्त असल्याचे ते म्हणाले. तिथे लोकांनी त्यांची शिकवण आत्मसात केल्याचेही ते म्हणाले.

    शरद पवार पुढे म्हणाले की, ‘कोणी योग्य पर्याय देऊ शकत असेल तर राष्ट्रवादी देऊ शकते, हे जनतेच्या मनात बसायला हवे. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अत्याचार झालेल्या समाजातील लोकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. ज्यांना आपल्या जीवनात रस नाही, त्यांच्याशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समरसून राहावे. उपेक्षितांना सन्मानाने जगण्याच्या हक्कासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदैव तत्पर असले पाहिजे.

    ते पुढे म्हणाले, पंधरा दिवसांपूर्वी मी विदर्भ दौरा केला. या भागातील आदिवासी लोक अनेक संकटांना तोंड देतात. नक्षलवादाचा त्रास आहे. यातून मार्ग काढून आज तेथील तरुण पिढी शिक्षित होण्याचा, पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय. राजकीय विचारांबाबत त्यांच्याशी बोललो तर त्यांना राष्ट्रवादीचा विचार जवळचा वाटतो.

    सर्वांचे आभार

    आज वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटरला आयोजित कार्यक्रमात सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांच्या केलेल्या वर्षावाने भारावून गेलो आहे. यापूर्वी अनेकदा माझा वाढदिवस साजरा झाला. मी पन्नास वर्षांचा झालो तेव्हा नागपूरला विदर्भातील सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वाढदिवस साजरा केला. साधारण तुम्ही लक्षात घेतलं तर ५०, ६१, ७५ या तीन टप्प्यावर वाढदिवसाचे कार्यक्रम झाले. पण ८१व्या वाढदिवसाला कार्यक्रम असावा असे काही मला वाटत नव्हते. पण पक्षाने आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला व तुम्ही सर्वांनी प्रेमाने कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी अंतःकरणापासून आपला आभारी आहे. मी ६१ वर्षांचा झालो तेव्हा श्री. भुजबळ यांनी पुढाकार घेऊन नाशिकमध्ये स्व. अटलजींच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. ७५ वर्षांचा झालो तेव्हा दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि १५ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

    ते पुढे म्हणाले की, देशात, महाराष्ट्रात आणखी काम करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला प्रोत्साहन दिले आहे. १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. तो माझा वाढदिवस आहे म्हणून नाही तर १२ डिसेंबर हा माझ्या आईचाही जन्मदिवस आहे.
    योगायोग म्हणजे आमच्या कुटुंबातील दोन-तीन सदस्यांचा याच दिवशी वाढदिवस असतो. तर पाठोपाठ १३ डिसेंबरला पत्नीचाही वाढदिवस येतो.

    …तोच खरा कार्यकर्ता असतो

    काल मी सांगितलेली लहानशी कविता मला पूर्ण आठवत नाही. कदाचित त्या कवीचे नाव मोतीलाल राठोड असावे. मोतीलाल बंजारा समाजातील विद्यार्थी होता. मोतीलालशी संवाद साधताना त्याने लिहिलेली कविता ऐकवली. कवितेचे नाव होते ‘पाथरवट’. पाथरवट म्हणजे छिन्नी हाती घेऊन हातोडीने दगड फोडणारे पाथरवट. या कवितेचे मर्म असे होते की, ज्या व्यक्तीच्या हातांनी दगडातून मूर्ती घडवली त्याच व्यक्तीला मंदिरात येऊ दिले जात नाही. ही तुमची समाज रचना आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे, अशी या कवितेमागची भावना होती. अशी एखादी कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येत नाही. आपण स्वतः गुन्हेगार असल्याची भावना निर्माण होते. समाजातील उपेक्षित, वंचितांवर जे अन्याय झाले ते दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आज गरजेचे आहे. अशा कविता ऐकल्यावर जो अस्वस्थ होतो तो पक्षाचा खरा कार्यकर्ता आहे.

    कृषिमंत्री असतानाची आठवण

    पवारांनी यावेळी एक आठवण सांगितली. ते म्हणाले की, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ते भारताचे कृषिमंत्री असतानाची ही घटना आहे. ते म्हणाले, ‘मी कृषिमंत्री असताना माझ्याकडे एक फाईल आली होती, ती फाईल ब्राझीलमधून धान्य आयात करण्याशी संबंधित होती. कृषिप्रधान देश दोन वेळचे अन्न देऊ शकत नाही हे जाणून मला खूप वाईट वाटले. मी त्या फाईलवर सही केली नाही. यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली. मी सही केली नसती तर देशात अन्नधान्याचे संकट आले असते. मी अनिच्छेनेच त्या फाइलवर सही केली. यानंतर शेतीत नवनवीन प्रयोग, तंत्र वापरण्याचे प्रयत्न सुरू झाले. काही वर्षांतच आपला देश 18 देशांना धान्य देणारा देश झाला आहे, असेही ते म्हणाले.

    Sharad Pawar Address To NCP Party Workers On His 81st Birthday

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!