• Download App
    सांगलीची जागा चर्चा न करता परस्पर शिवसेनेला दिली; कोल्हापूरात पवारांची कबुली!! Sharad pawar accepts conspiracy, sangli loksabha constituency given to shivsena without discussions with Congress

    सांगलीची जागा चर्चा न करता परस्पर शिवसेनेला दिली; कोल्हापूरात पवारांची कबुली!!

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये प्रचंड संताप असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे (Sharad pawar) अध्यक्ष शरद पवारांनी कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत आज धक्कादायक खुलासा केला. आम्ही कोणीही जादा जागा मागायच्या नाहीत असे सूत्र ठरवून महाविकास आघाडीत जागावाटप केले, पण सांगलीची जागा कोणतीही चर्चा न करता शिवसेनेला परस्पर देऊन टाकली, अशी कबुली शरद पवारांनी दिली. Sharad pawar accepts conspiracy, sangli loksabha constituency given to shivsena without discussions with Congress

    महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांबद्दल महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. परंतु, सांगलीची जागा हा एकमेव अपवाद ठरला, जिथे चर्चा न करता तो मतदारसंघ परस्पर शिवसेनेला दिला. पण आता निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या निर्णयासह मतदारांना सामोरे जावे, अशी सूचनाही पवारांनी केली.

    ज्या सांगली लोकसभा मतदारसंघावर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या घराण्याचे वर्चस्व आहे, तो मतदार संघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कुठलीही चर्चा न होता, परस्पर काँग्रेसच्या हातात काढून घेऊन तो शिवसेनेला दिला, हा धक्कादायक खुलासा महाविकास आघाडीत राहून काँग्रेस कशी तोट्यात गेली, हे उघड्यावर आणणारा आहे. तसेच पवार आणि ठाकरेंनी काँग्रेसला त्यांच्याच बालेकिल्ल्यात कसे चीतपट केले, तेही सांगणारा आहे. पवारांच्या धक्कादायक खुलाशामुळे काँग्रेसमधली अस्वस्थ वाढून महाविकास आघाडीला तडे जाण्याची दाट शक्यता आहे.



    सांगलीत मोठा उलटफेर

    सांगलीची जागा उद्धव ठाकरे गटाला सोडल्याने काँग्रेसमधील काही नेते नाराज आहेत. त्यांनी ही जागा शिवसेनाला दिल्यावर जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी तर आक्रमक पवित्रा घेतला. त्यातच वंचितने प्रकाश शेंडगे यांना दिलेला पाठिंबा काढला आणि तो विशाल पाटील यांना जाहीर केला. त्यामुळे सांगलीच्या लढतीत रंगत आली आहे.

    नाराजी तर कायम

    कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावरुन लढण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांचा मतदारसंघ काँग्रेसला दिला. तर त्या मोबदल्यात ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केला. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी दिली. त्यावरुन विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी जाहीर केली. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या कामाला सुरुवात केली. पण काल त्यांनी पुन्हा नाराजीचा सूर आळवला. सांगलीची जागा काँग्रेसकडून जात नव्हती. पण काहीतरी शिजलंय, काहीतरी षडयंत्र झाल्याचा दावा कदम यांनी केला आहे.

    शरद पवार म्हणाले :

    आम्ही, सर्व विरोधक एकत्र बसलो. त्यावेळी आम्ही हा विचार केला की उगीच जादा जागा मागायच्या नाहीत. जिथे निवडून येण्याची शक्यता आणि भाजपचा पराभव करण्याची शक्यता ज्यांची आहे, त्यांना संधी द्यायची. आम्ही फक्त 10 जागा घेतल्या. कोल्हापूरची जागा स्वतःहून छत्रपती शाहू महाराज यांना आग्रह करुन दिली.जाहीर सभेत प्रचंड प्रतिसाद दिसतोय.

    सांगलीच्या जागा वाटपाविषयी प्रश्न विचारण्यात आला असता, शरद पवार म्हणाले, सांगली एकच अपवाद आहे. जिथे चर्चा न करता हा मतदारसंघ देण्यात आला. पण आता निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो घेऊन मतदारांसमोर जावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

    Sharad pawar accepts conspiracy, sangli loksabha constituency given to shivsena without discussions with Congress

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!