विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shankaracharya मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. देशभरातून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या भूमिकेवर टीका केली आहे.Shankaracharya
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद ( Shankaracharya ) यांचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मराठीला कानशिलात लगावणारी भाषा बनवल्याने यश मिळेल का? हिंदी ही राजभाषा आहे, त्याचा प्रोटोकॉल बनतो. ठाकरे हे देखील महाराष्ट्राच्या बाहेरून आले होते, ठाकरे मगधमधून आले होते, त्यांनाही मराठी येत नव्हती. महाराष्ट्राने त्यांना स्वीकारले आणि आज तेच मराठीसाठी भांडत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.Shankaracharya
पुढे बोलताना स्वामी अविमुकतेश्वरानंद म्हणाले, राज ठाकरेंच्या बद्दल बोलायचे तर, याचा अर्थ देशातील कायदा व्यवस्था समाप्त झाली आहे. कोणी सार्वजनिक ठिकाणी उभे राहून मारहाण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहे, म्हणजेच कॉन्स्परन्सी आहे की, लॉ अँड ऑर्डर धोक्यात आहे.
राज ठाकरेंनी मला मराठी शिकवावी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मला मराठी शिकवावी, मी दोन महीने मुंबईत असणार आहे, असे स्वामी अविमुकतेश्वरानंद म्हणाले. मला मराठी शिकवावी. मी मराठी शिकू इच्छित आहे. तुम्ही मला मराठी शिकवा, मी देशभरात मराठी शिकवेल. दोन महिन्यांनी मी जेव्हा इथून जाईन, तेव्हा त्यांच्यासोबत मराठीत बोलूनच जाईल. महाराष्ट्रातील संतांचे ज्ञान मराठीत आहे, मी ते ज्ञान ग्रहण करू इच्छित आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारवर नाराजी
स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी सध्याच्या महायुती सरकारवर देखील टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील यापूर्वीच्या एकनाथ शिंदे सरकारने गाईंना राज्यमातेचा दर्जा देत सन्मान केला. मात्र, सध्याच्या सरकारने कुठलाही प्रोटोकॉल बनवला नाही, असे म्हणत त्यांनी फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली.
Shankaracharya Criticizes Raj Thackeray on Marathi Stance
महत्वाच्या बातम्या
- Taliban : तालिबान नेत्यांविरुद्ध इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाचे अटक वॉरंट; महिलांवरील अत्याचाराचे आरोप
- Trump : युक्रेनला शस्त्र पुरवठा रोखल्याने ट्रम्प नाराज; पेंटागॉनने याबद्दल राष्ट्राध्यक्षांना माहिती दिली नाही
- Tahawwur Rana, : दहशतवादी तहव्वूरची न्यायालयीन कोठडी 13 ऑगस्टपर्यंत वाढली; NIAने पुरवणी आरोपपत्र दाखल केले
- Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाने म्हटले- संसदेला सूचना देऊ शकत नाही, कायदे बनवणे-बदलणे त्यांचे काम; BNSची कलमे हटवण्याची याचिका फेटाळली