विशेष प्रतिनिधी
नांदेड : Shinde शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत लोकांवरजबरदस्तीने लादला जाणार नाही. काही ठिकाणी विरोधअसेल तर शेतकरी व स्थानिकांसोबत चर्चा होईल.विरोध कायम राहिला, तर त्या भागातील अलायमेंटबदलले जाईल. मराठवाड्यातील जिल्ह्यांनाविकासाकडे नेणारा हा महामार्ग आहे. समृद्धीमहामार्गाच्या वेळीही असाच विरोध झाला होता. मात्र,त्याचे महत्त्व समजल्यावर लोकांनी स्वतःहून जमीनदिली, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. Shinde
गुरुवारी (दि. ६) नवा मोंढा मैदानावर झालेल्याआभार सभेत ते बोलत होते. दुपारी २.३० वाजताउपमुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. विधानसभानिवडणुकीत बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवलाअसे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अडीचवर्षे विरोधकांनी शिव्या दिल्या तरी आम्ही आमच्याकामांतून त्यांना उत्तर दिले. त्यामुळे जनता आमच्यासोबत आहे. शिव्या दिल्या तरी लोकांच्या तोंडूनओव्याच बाहेर पडल्या, असेही त्यांनी सांगितले.सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देणाऱ्या कोणत्याहीयोजना बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.व्यासपीठावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,आमदार हेमंत पाटील, बालाजीराव कल्याणकर,आनंदराव बोंढारकर, माजी खासदार सुभाषराववानखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मराठवाड्याची दुष्काळवाडा हीओळख पुसायची आहे. महायुतीसरकारने मराठवाडा वॉटरग्रीडयोजनेला चालना दिली. जलयुक्तशिवार योजना पुन्हा सुरू केली.महाविकास आघाडीने बंद केलेलेप्रकल्प आणि कामे पुन्हा सुरू केले,लोकाभिमुख योजना राबवल्या.त्यामुळे मुख्यमंत्री किंवाउपमुख्यमंत्री पदापेक्षा लाडक्याबहिणींचा लाडका भाऊ म्हणूनमिळालेला बहुमान मोठा आहे, असेत्यांनी सांगितले. एमआयडीसीचाप्रश्न सोडवणार, पाणी आणिरस्त्यांसह रखडलेले अन्य प्रश्नमार्गी लावणार, असेही एकनाथ शिंदेयांनी स्पष्ट केले.
अजित पवारांमुळे शतक हुकले
गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीठाकरे गटावर टीका केली. ते म्हणाले, शिवसेना-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार आमच्या गटातसामील झाले. ते आले नसते तर आमच्या लढवायच्या जागा वाढल्या असत्या आणि आम्ही विजयी जागांचे शतकपूर्ण केले असते. शिवसेना फोडण्याचे काम संजय राऊत यांनी केले, अशी टीका मंत्री पाटील यांनी भाषणात केली.
Shaktipeeth path will not be imposed on farmers, problem will be solved through discussion, DCM Shinde’s statement in Nanded
महत्वाच्या बातम्या
- Pinaka : ‘पिनाका’ रॉकेट प्रणालीसाठी १० हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या करारावर स्वाक्षरी
- Samudrayan : समुद्रयान अन् चांद्रयान-४ कधी प्रक्षेपित होणार आहेत?
- माहेरच्या गोदेकाठच्या संस्कारातूनच पुढे आणखी चांगले कार्य; जुन्या आठवणींना उजाळा देत सत्कारमूर्ती विजयाताईंची ग्वाही!!
- Kejriwal : एक्झिट पोलवर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘जर भाजपला ५५ जागा मिळत असतील तर…’