Serum reduced the price of Covishield vaccine : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी लसीची किंमत कमी केली आहे. राज्य सरकारला देण्यात येणाऱ्या कोव्हिशील्डच्या किमतीत 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या किंमतीमुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. कोव्हिशील्डचा एक डोस आता राज्य सरकारांना 400 ऐवजी 300 रुपयांना मिळणार असल्याचे सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी जाहीर केले आहे. Serum reduced the price of Covishield vaccine, now states will get it at Rs 300 instead of Rs 400
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी लसीची किंमत कमी केली आहे. राज्य सरकारला देण्यात येणाऱ्या कोव्हिशील्डच्या किमतीत 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या किंमतीमुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. कोव्हिशील्डचा एक डोस आता राज्य सरकारांना 400 ऐवजी 300 रुपयांना मिळणार असल्याचे सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी जाहीर केले आहे.
किंमत कपात करण्याचे ट्विट सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी केले आहे. ते म्हणाले, “सीरमच्या वतीने परोपकारी पाऊल उचलून मी तत्काळ प्रभावाने या लसीची किंमत राज्यांना 400 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत कमी करत आहे.” यामुळे राज्य सरकारच्या निधीतून कोट्यवधी रुपयांची बचत होईल. याद्वारे अधिक लसीकरण करता येईल आणि अनेकांचे प्राण वाचू शकतील.”
जानेवारीत डीसीजीआयने कोरोनाविरुद्ध युद्धात आणीबाणीच्या वापरासाठी दोन लसींना मान्यता दिली. यात सीरमची कोव्हिशील्ड व दुसरी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात सीरमने केंद्र सरकारला 250 रुपयांना डोस दिला, त्यानंतर किंमत कमी करून 150 रुपये केली गेली. त्याचवेळी 1 मे पासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या लसीची घोषणा केली गेली, तेव्हा सीरम आणि भारत बायोटेकने नवीन किंमती जाहीर केल्या. सीरम आता राज्य सरकारला 300 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना लस देणार आहे. तर भारत बायोटेक राज्य सरकारांना 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांत कोव्हॅक्सिनचा एक डोस देणार आहे.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील बुधवारी दुपारी चार वाजेनंतर कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे. कोविन आणि आरोग्य सेतूमार्फत 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींना नोंदणी करणे बंधनकारक आहे. सुरुवातीला कोविन सर्व्हरवर काही समस्या उद्वभवल्या परंतु नंतर वेबसाइट योग्यरीत्या सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यासह अनेक राज्यांनी आपल्या राज्यात मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने सुमारे 15 कोटी लोकांना लसी दिल्या आहेत. सध्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस दिली जात आहे.
Serum reduced the price of Covishield vaccine, now states will get it at Rs 300 instead of Rs 400
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccine Registration : नोंदणीच्या वेळी क्रॅश झालेले कोविन सर्व्हर पुन्हा सुरू, आरोग्य सेतूने दिले स्पष्टीकरण
- India Fights Back : पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीस पंतप्रधान मोदींची मंजुरी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 18 ते 44 वयापर्यंत मोफत लसीकरणाची घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय
- कोरोनाविरुद्ध येणार फायझरचे ओरल औषध, वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होण्याचा कंपनीचा दावा
- बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक, कोरोनाचे नियम मोडल्याचा आरोप