विशेष प्रतिनिधी
पिंपरी : शहरांमधील हजारो गृहनिर्माण संस्थांना विकसकाच्या कडून डीम्ड कन्व्हेयन्स आणि जागेचा मालकी हक्क देण्याबाबत टाळाटाळ केली जाते. पुणे व पिंपरी चिंचवड तसेच पुण्याच्या उपनगरी भागातील विशेषता मावळ, मुळशी तालुक्यातील हजारो गृहनिर्माण संस्था अद्यापही डीम्ड कन्व्हेयन्स आणि मालकी हक्क पासून वंचित आहेत.Seminar on Deemed Convenience and Ownership in Aundh on Sunday
यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. याबाबत गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी दि. २७ फेब्रुवारी रोजी औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे सायंकाळी ५ वाजता “गृहनिर्माण संस्था यांचे मानीव अभिहस्तांतरण व मालकी हक्क” यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका ॲड. अंजली कलंत्रे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
महा – रेरा अंतर्गत डीम्ड कन्व्हेन्स संस्था नोंदणी आणि जागेचा मालकी हक्क मिळण्यासाठी शासकीय तरतुदी त्याचे फायदे व यात येणाऱ्या अडचणी याबाबत भागधारकांशी या चर्चासत्रात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे एन. व्ही. आघाव आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुणे शहर एन. ए. अनपट – भोसले संवाद साधणार आहेत.
तसेच यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक ॲड. अंजली कलंत्रे तसेच उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर स्नेहा जोशी या मार्गदर्शन करणार आहेत. कायझेन मीडियाच्या समन्वयक शिल्पा देशपांडे या संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून या कार्यक्रमास येताना नागरिकांनी आपल्या गृहनिर्माण संस्थेशी संबंधित असणाऱ्या कागदपत्रांची फाईल घेऊन यावे असे आवाहन संयोजिका शिल्पा देशपांडे यांनी केले आहे. मावळ, मुळशी, औंध, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व भागधारकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने केले आहे.
Seminar on Deemed Convenience and Ownership in Aundh on Sunday
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाचे मास्कसह सर्व निर्बंध रद्द, ब्रिटनमध्ये निर्णय महाराष्ट्रातही तयारी सुरू
- दाऊदसारख्या देशद्रोह्यासोबत संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांना भर चौकात फाशी द्यावी, आमदार महेश लांडगे यांची मागणी
- पंतप्रधान मोदींनी पुढे येऊन रशिया- युक्रेनचे युध्द थांबवावे, संपूर्ण जगातील नेत्यांची इच्छा असल्याचे हेमा मालिनी यांचे वक्तव्य
- राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचे अमृता फडणवीस यांच्याविषयी निर्लज्ज वक्तव्य, शरद पवार, सुप्रिया सुळे करणार का कारवाई?