• Download App
    नाशिक-पुणे मार्गावर धावणार सेमी हायस्पीड ट्रेन; केंद्राकडून निधी; केवळ दोन तासांत पोचता येणार|Semi high speed train to run on Nashik-Pune route; Funding from the center; Can be reached in just two hours

    नाशिक-पुणे मार्गावर धावणार सेमी हायस्पीड ट्रेन; केंद्राकडून निधी; केवळ दोन तासांत पोचता येणार

    वृत्तसंस्था

    पुणे : नाशिक-पुणे मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन धावणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पुणे नाशिक हे अंतर दोन तासांवर येणार आहे.Semi high speed train to run on Nashik-Pune route; Funding from the center; Can be reached in just two hours

    नाशिक-पुणे ३३५.१५ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला केंद्र सरकारच्या वित्त आयोगानेही २० पैकी १९.६ टक्के निधीला मान्यता दिली. राज्य शासनाने आपल्या हिश्श्याच्या ३२ कोटींच्या निधीला आधीच मान्यता दिलेली आहे. समभागातून ६० टक्के निधी उपलब्ध आहे.



    त्यामुळे आता नीती आयोग आणि केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष काम चार महिन्यांत सुरू होणार आहे.नाशिक, अहमदनगर आणि पुणे हे तीन जिल्हे एकमेकांना जोडले जातील.

    या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी तीन वर्षांपूर्वी दोन कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर झाला होता. त्यानंतर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. परंतु, राज्य व समभागातील निधी मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांपासून केंद्राच्या २० टक्के हिश्श्याचा निधी प्रलंबित होता

    या मार्गावर स्थानके

    पुणे जिल्ह्यात १२, नगर जिल्ह्यात ६ आणि नाशिक जिल्ह्यात चास, दाेडी, सिन्नर, माेहदरी, शिंदे आणि नाशिकराेड अशी ६ स्थानके असतील. प्रतितास असलेली गती २५० किलाेमीटर या वेगाने रेल्वे धावणार आहे. प्रत्येक ७५० मीटर अंतरावर, रेल्वे मार्गाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला येण्या-जाण्याची सुविधा असेल.

    Semi high speed train to run on Nashik-Pune route; Funding from the center; Can be reached in just two hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!