वृत्तसंस्था
मुंबई : गणेशोत्सवासाठी पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस शहरात कलम १४४ लागू केले आहे.section 144 imposed in mumbai for next 9 days ganesh festival
पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदीचा आदेश लागू केल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमण्यास बंदी आहे. मुंबई पोलिसांकडून आदेश जारी केले आहेत. पोलिसांच्या आदेशानुसार आता गणेशोत्सव काळात मिरवणुकांना परवानगी नसेल.नियमावलीनुसार प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध केला आहे. या दर्शनासाठी गर्दी न करण्याचं आवाहन केले आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.
पुण्यातही दहा दिवस १४४ कलम लागू
पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी खबरदारी म्ह्णून गणेशोत्सवाच्या दहा दिवसात जमावबंदी (१४४ कलम) लागू आहे. १० ते १९ सप्टेंबरसाठी हा आदेश लागू असून उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे,
असा इशारा पुणे शहर पोलिस सहायुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला. शहर पोलीस दलाकडून ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
section 144 imposed in mumbai for next 9 days ganesh festival
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हे सर्व मुस्लिमांचे मते घेतात अन् मुलांना तुरुंगात सडवतात!’, यूपीत ओवैसींनी सपा, बसपा अन् काँग्रेसला धू-धू धुतले!
- Ford India : अमेरिकन कंपनी भारतात कारचे उत्पादन करेल बंद , चार हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर होईल परिणाम
- तामिळनाडूत शशिकला यांच्यावर प्राप्तिकर विभागाची कारवाई, तब्बल 100 कोटींची मालमत्ता जप्त
- मुंबई : बिल्डर आणि फिल्म फायनान्सर युसूफ लकडावाला यांचे आर्थर रोड कारागृहात निधन, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही