• Download App
    राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून कुलगुरुंचा शोध; सरकारच्या बदल केलेल्या कायद्याकडे दुर्लक्ष । Search for Vice-Chancellor by Governor Koshyari; Ignoring government-amended legislation

    राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून कुलगुरुंचा शोध; सरकारच्या बदल केलेल्या कायद्याकडे दुर्लक्ष

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील सुधारणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राज्यपाल कोश्यारी यांनी आता मुंबई विद्यापीठासाठी नव्या कुलगुरू यांचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. Search for Vice-Chancellor by Governor Koshyari; Ignoring government-amended legislation

    मंत्रिमंडळाने तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील सुधारणा कायदा मंजूर केला होता. पण, त्याकडे राज्यपाल यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तसेच मुंबई विद्यापीठाचा नवीन कुलगुरू नेमण्यासाठी बैठक घ्यावी, अशी सूचना व्यवस्थापकीय आणि शैक्षणिक परिषदेला केली आहे.



    डिसेंबर २०२१ मध्ये, राज्य सरकारने कुलगुरु निवड पद्धतीत बदल केला. ज्या अंतर्गत राज्य आता निवड पॅनेलद्वारे निवडलेल्या पाच नामनिर्देशित व्यक्तींची यादी प्राप्त करेल. दोघांची निवड करेल आणि ती राज्यपाल यांच्याकडे पाठवेल. त्या द्वारे राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू निवडले जाणार होते. पण, या प्रक्रियेकडे राज्यपालांनी साफ दुर्लक्ष केले असून कुलगुरु निवडीसाठी स्वतंत्र सूचना केल्या आहेत.

    Search for Vice-Chancellor by Governor Koshyari; Ignoring government-amended legislation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल