वृत्तसंस्था
पुणे : शहरात शववाहिका कमी पडत असल्यामुळे स्कूल बसचा शववाहिका म्हणून वापर करण्यात येणार आहे. आरटीओ कार्यालयाच्या सहकार्यातून पुणे महापालिकेस 10 स्कूल बस देण्यात आल्या आहेत.School bus converted to hearse in Pune; Decision due to ambulance errors: Employers after one year of employment
मागील काही दिवसांपासून मृत रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शववाहिका कमी पडत आहेत. टेम्पो ट्रॅव्हलर, स्कूल बसमधील पॅसेंजर सीट काढून त्याचा वापर शववाहिका म्हणून करता येऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अशा बसची मागणी केली होती. महापालिकेस त्यांनी 10 बस भाडेतत्वावर दिल्या आहेत.
या वाहनाचे भाडे, चालक भत्ते व मानधन महापालिका देणार आहे. या वाहनांसाठी महापालिका प्रतिदिन 1 हजार 600 रूपये भाडे देणार आहे. यामुळे स्कूल बसचालकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
School bus converted to hearse in Pune; Decision due to ambulance errors: Employers after one year of employment
महत्त्वाच्या बातम्या
- Cowin Registeration : पहिल्याच दिवशी लसीकरणासाठी १ कोटींहून अधिक नागरिकांची नोंदणी
- कोरोनाविरुध्द लढण्याची ही जिद्द आपल्याला देईल प्रेरणा, लातूरमधील १०५ वर्षांचे आजोबा आणि ९५ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात
- आमने-सामने : खानदेशी बोलीभाषेत खडसे म्हणतात ‘ गिरीश मेला का?’ ; गिरीश महाजनांनी घेतले इजी म्हणाले ‘खडसेंच वय झालयं!’
- वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण , वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी अखेर गजाआड
- परमवीर सिंग याना अडविण्याचा असाही डाव, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
- प्रिन्स चार्ल्स यांची कृतज्ञता, म्हणाले भारताने संकटकाळात सर्वांची मदत केलीय आता आपले कर्तव्य