• Download App
    सातारा : एसटीवर अचानक दगड फेक ; हल्लेखोराने दुचाकीवरून काढला पळ । Satara: Sudden stone throwing on ST; The assailant fled on a two-wheeler

    सातारा : एसटीवर अचानक दगड फेक ; हल्लेखोराने दुचाकीवरून काढला पळ

    दगडफेक केल्यानंतर त्याने दुचाकीवरून पळ काढला.अचानक दगडफेक केल्याने खळबळ उडाली आहे. Satara: Sudden stone throwing on ST; The assailant fled on a two-wheeler


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : गेल्या काही दिवसांपूर्वी कराड येथील सुर्ली घाटात आटपाडी बसवर दगडफेक केली होती. दरम्यान आता पुन्हा दगडफेक झाली.यावेळी सातारा बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर बस कास तलाव परिसरात आल्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने अचानक एसटी बसवर दगडफेक केली.

    या दगडफेकीत चालकाच्या बाजूची दरवाज्याची काच फुटली असून सुदैवाने चालकाला कोणतीही इजा झाली नाही.ही दगडफेक चालकाच्या दिशेने करण्यात आली. हा व्यक्ती झाडीत दबा धरुन बसला होता.दगडफेक केल्यानंतर त्याने दुचाकीवरून पळ काढला.अचानक दगडफेक केल्याने खळबळ उडाली आहे.



    कास तलाव परिसरात जंगल मोठ्या प्रमाणात असल्याने दगडफेक करणारे झाडीत दबा धरून बसले होते.दगडफेक कोणी केली यांचा शोध पोलिसांकडून सुरू केला आहे.जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून या संपतील काही कर्मचारी कामावर हजर झाल्याने संपात फूट पडली आहे.

    Satara: Sudden stone throwing on ST; The assailant fled on a two-wheeler

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस