• Download App
    सातारा : जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण , संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करुन घ्यायचे केले आवाहन Satara: Popular MP of the district Srinivas Patil appealed to check all those who came in contact with corona.

    सातारा : जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण , संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करुन घ्यायचे केले आवाहन

    खा. श्रीनिवास पाटील यांच्यावर मुंबई येथील रूग्णालयात उपचार सुरू असून तब्बेत व्यवस्थित असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले. Satara: Popular MP of the district Srinivas Patil appealed to check all those who came in contact with corona.


    विशेष प्रतिनिधी

    कराड : दिवसेंदिवस कोरोना वाढतच चालला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून मोठमोठ्या नेत्यांना तसेच आमदार – खासदारांना देखील कोरोनाची लागण होताना दिसत आहे.अशातच सातारा जिल्ह्याचे खासदार व राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्यावर मुंबई येथील रूग्णालयात उपचार सुरू असून तब्बेत व्यवस्थित असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले.

    खा. श्रीनिवास पाटील यांनी याबाबत लोकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते उपचार सुरु असून कृपया काळजी करु नये.आपणास विनंती आहे की, गेली दोन तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा.

    गेल्या चार दिवसात खा.पाटील यांनी सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती.तसेच खासदार पाटील यांच्या कार्यालयात दररोज लोकांची कामानिमित्त गर्दी असते.तसेच रोज विविध कार्यक्रमानिमित्त जनमानसात मिसळून सहभागी होत असतात.

    Satara: Popular MP of the district Srinivas Patil appealed to check all those who came in contact with corona.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajit Pawar : प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो; शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

    Anjali Damania : पार्थ पवारांचे जमीन घोटाळा प्रकरण, न्यायालयामध्ये जाण्याचा दमानियांनी दिला इशारा

    Uday Samant : शिंदे गटाने फेटाळली नाराजीची चर्चा, मंत्री उदय सामंत म्हणाले – आमचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांना नाही तर कुणाला सांगणार