• Download App
    सातारा : रिक्षा स्टॉप जवळ देव माणूस डॉ. अजितकुमार देव यांचा पुतळा ; पोलिसांनी एकावर केली कारवाई । Satara: Near the rickshaw stop, God man Dr. Statue of Ajit Kumar Dev; Police took action against one

    सातारा : रिक्षा स्टॉप जवळ देव माणूस डॉ. अजितकुमार देव यांचा पुतळा ; पोलिसांनी एकावर केली कारवाई

    कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई या ठिकाणी देवमाणूस मधील प्रमुख व्यक्तिरेखा डॉ अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळे पाहायला मिळले. Satara: Near the rickshaw stop, God man Dr. Statue of Ajit Kumar Dev; Police took action against one


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : ‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली.‘देवमाणूस ने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता आणि त्यानांतर प्रेक्षक व चाहत्यांमध्ये चर्चा रंगली ती म्हणजे देवमाणूसच्या दुसऱ्या भागाची. कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई या ठिकाणी देवमाणूस मधील प्रमुख व्यक्तिरेखा डॉ अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळे पाहायला मिळले.



    दरम्यान साताऱ्यातील राजवाडा परिसरातील अजिंक्य रिक्षा स्टॉप जवळ देव माणूस डॉ. अजितकुमार देव यांचा पुतळा विनापरवाना उभारण्यात आला.हा पुतळा उभारल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच नागरिकांच्या जिवीतास धोका होईल अशा पद्धतीने लावल्यामुळे पोलिसांनी एकावर कारवाई केली. याबाबत हवालदार विश्वनाथ वसंत मेचकर यांनी फिर्याद दिली आहे.

    हवालदार मेचकर यांना अजिंक्य रिक्षा स्टॉप परिसरात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास डॉ. अजितकुमार देव यांचा काल्पनिक पुतळा बसविला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान चौकशीमध्ये हा पुतळा एका खासगी वाहिनीचा मालिकेच्या प्रमोशनसाठी आणल्याचे समोर आले.

    Satara : Near the rickshaw stop, God man Dr. Statue of Ajit Kumar Dev; Police took action against one

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anjali Damania : धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत, पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे: ३,००० कोटींच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू

    Bombay HC : हायकोर्टाने म्हटले- रस्ता खराब असल्यास फक्त कंत्राटदार कंपनीवरच FIR का? PWD अधिकारी कसे सुटू शकतात?