• Download App
    Santosh Deshmukh Murder Case Court Rejects Valmik Karad Bail Plea संतोष देशमुख हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला,

    Valmik Karad : संतोष देशमुख हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला, दोषमुक्ती अर्जावर 10 सप्टेंबरला सुनावणी

    Valmik Karad

    विशेष प्रतिनिधी

    बीड : Valmik Karad मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयाने फेटाळला. वाल्मीक कराडवर गंभीर गुन्हा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला असून, त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.Valmik Karad

    सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यासह राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. हे प्रकरण विधानसभेतही गाजले. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. याआधी कराडचा दोषमुक्ती अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. कराडचा जामीन अर्ज आणि चाटेच्या दोषमुक्ती अर्जावर 18 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती.Valmik Karad

    न्यायालयात काय घडले?

    मागील सुनावणीत वाल्मीक कराडच्या वकिलांनी तीन तास युक्तिवाद करत त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगितले होते. त्यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, गंभीर गुन्हे दाखल असल्याने न्यायालयाने आज हा अर्ज नामंजूर करत फेटाळून लावला.Valmik Karad



    या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जावरील निकाल अद्याप राखून ठेवण्यात आला आहे. तर इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ती 10 सप्टेंबरला होणार आहे.

    आजच्या सुनावणीत प्रतीक घुले, महेश केदार आणि सुधीर सांगळे यांच्या दोषमुक्ती अर्जांवर फिर्यादींचे म्हणणे आले नसल्यामुळे ती सुनावणी पुढे ढकलली गेली. त्यांचे वकील दिग्विजय पाटील अनुपस्थित असल्याने अॅड. विकास खाडे यांनी पुढील तारीख मागितली. आता या अर्जांवरील सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. सरकारी पक्षाकडून विशेष सहाय्यक सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते. तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आजच्या सुनावणीला अनुपस्थित होते

    एक आरोपी अद्यापही फरार

    9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची मस्साजोग गावाजवळून अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास विशेष पथकाने केला असून, वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मीक कराडसह एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. आजच्या सुनावणीनंतर पुन्हा एकदा हा खटला चर्चेत आला असून, पुढील तारखेला होणाऱ्या सुनावणीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

    Santosh Deshmukh Murder Case Court Rejects Valmik Karad Bail Plea

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Jarange : हुल्लडबाज आंदोलक की सरकार हे समजून घ्या, मनोज जरांगे यांचे पत्रकारांना आवाहन

    Manoj Jarange : मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर मनोज जरांगे यांच्या अंगावरून आंदोलनाची जबाबदारी झटकायला सुरुवात!!

     High Court : उच्च न्यायालय म्हणत आंदोलकांनी आमच्याच गाड्या अडवल्या ; उद्या ४ वाजे पर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश