• Download App
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश, काल बरड येथे होता सोहळा|Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony entered Solapur district today, the ceremony was held at Barad yesterday

    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश, काल बरड येथे होता सोहळा

    प्रतिनिधी

    सातारा : आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा सोमवारी दि. 4 रोजी सकाळी 11 वाजता धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. माऊलींच्या पालखी सोहळ्यासमवेत रथापुढे 27 दिंड्या, तर रथामागे जवळपास 400 दिंड्या आहेत. सोहळ्यासोबत जवळपास चार ते साडेचार लाख वारकरी सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली असल्याचे सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी सांगितले.Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony entered Solapur district today, the ceremony was held at Barad yesterday

    संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या दृष्टीने दोन हजार शौचालये, 43 पाणी पुरवठा केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याच बरोबर राष्ट्रीय रस्ते महामार्ग विकास मंडळाच्या माध्यमातून धर्मपुरी ते वाखरी या सुमारे 75 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यातील तळाच्या व रिंगणाच्या जागांचे मुरमीकरण करण्यात आले आहे. त्याच बरोबर आरोग्य, पाणी पुरवठा आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत.



    श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते काल (रविवारी) पहाटे फलटण पालखी तळावर (विमान तळ) माऊलींची पुरुषसूक्त पूजा व अभिषेक झाला. तर शितोळे सरकारांच्या वतीने माऊलीस नैवेद्य दाखविण्यात आला. या पूजेचे पौरोहित्य प्रसाद जोशी, अमोल गांधी व राजाभाऊ चौधरी यांनी केले.

    यावेळी संस्थानचे विश्‍वस्त व पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, नाईक निंबाळकर परिवार , राज घराण्यातील सदस्य, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी ६.३० वाजता सोहळयाने बरडकडे प्रस्थान ठेवले. आणि या सोहळ्याने फलटण नगरीचा निरोप घेतला होता.

    माऊलींचा पालखी सोहळा वटवृक्षाच्या गर्द झाडीतून वाटचाल करीत सकाळच्या न्याहरीसाठी ९ वाजता विडणी येथे पोहोचला. न्याहरी नंतर सोहळा दुपारचा नैवेद्य व भोजनासाठी दुपारी ११.३० वाजता पिंप्रद येथे पोहोचला.

    दुपारी दीड वाजता हा सोहळा भोजन व विश्रांतीनंतर निंबळक फाटा मार्गे सायंकाळी बरड येथे पोहोचला. सरपंच तृप्ती गावडे, उपसरपंच गोरख टेंबरे, पोलिस पाटील सौ. अश्विनी टेंबरे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. वाटचालीत कधी ढगाळ तर कधी निरभ्र आकाश असे वातावरण असल्याने कधी आल्हाददायक तर कधी उकाडा अशा वातावरणात वारकऱ्यांनी वाटचाल केली. पंढरी समीप आल्याने वारकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. असंख्य वारकरी फलटणहून शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ झाले. त्यांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेतले व ते पुन्हा बरड येथे वारीत सहभागी झाले.

    Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony entered Solapur district today, the ceremony was held at Barad yesterday

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा