• Download App
    Sanjay Shirsat Faces Allegations Over 5000 Crore Land Deal मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादात; तब्बल 5 हजार कोटींची जमीन बिवलकर कुटुंबाला दिल्याचा रोहित पवारांचा आरोप

    Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादात; तब्बल 5 हजार कोटींची जमीन बिवलकर कुटुंबाला दिल्याचा रोहित पवारांचा आरोप

    Sanjay Shirsat

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sanjay Shirsat महाराष्ट्रातील मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाटांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, सिडकोचे अध्यक्षपद मिळताच संजय शिरसाट यांनी नियम धाब्यावर बसवून बिवलकर कुटुंबाला तब्बल ५ हजार कोटींची किंमत असलेली १५ एकर जमीन दिली.Sanjay Shirsat

    बिवलकर कुटुंबावर वादग्रस्त जमीन खैरात?

    रोहित पवार म्हणाले की, बिवलकर कुटुंबाने मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना साथ दिली होती. त्या काळी ब्रिटिशांनी त्यांना नवी मुंबई परिसरातील सुमारे ४ हजार एकरहून अधिक जमीन दिली होती. नंतर कायदे व न्यायालयीन निर्णयांनुसार ही जमीन सरकारकडे जमा झाली. तरीही बिवलकर कुटुंबाने ही जमीन परत मिळवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले, पण त्यांना नेहमी नकार मिळाला.Sanjay Shirsat



     

    तथापि, २०२४ मध्ये सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत सुमारे १५ एकर जमीन या कुटुंबाला दिल्याचा आरोप पवारांनी केला. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत तब्बल ५ हजार कोटी आहे.

    गरिबांच्या हक्कावर डल्ला– रोहित पवार

    रोहित पवार म्हणाले की, ही जमीन सिडकोकडेच राहिली असती तर गरिबांसाठी किमान १० हजार घरे बांधता आली असती. मात्र, गरिबांच्या हक्काची जमीन शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली. हजारो स्थानिक भूमिपुत्रांना अजूनही जमीन मिळालेली नाही, पण ब्रिटिशांना साथ देणाऱ्या कुटुंबाला प्रचंड मौल्यवान जमीन देणे म्हणजे भूमिपुत्रांशी गद्दारी असल्याचे पवारांनी म्हटले.

    त्यांनी मागणी केली की, बेकायदेशीरपणे दिलेली ही जमीन सरकारने परत घ्यावी आणि मंत्री शिरसाट यांनी राजीनामा द्यावा.

    शिरसाटांच्या वादग्रस्त घटनांची मालिका

    संजय शिरसाट यांचे नाव याआधीही अनेक वादांमध्ये आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पैशांनी भरलेली बॅग दिसत होती. या व्हिडिओवरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

    याशिवाय शिरसाटांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलावात सहभाग घेतला होता. बाजारभावानुसार हॉटेलची किंमत ११० कोटी होती, पण केवळ ६७ कोटींमध्ये ते मिळवल्याचा आरोप झाला. जोरदार वादानंतर शिरसाटांच्या मुलाला या लिलावातून माघार घ्यावी लागली होती.

    361 कागदपत्रांचा पुरावा

    रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाचे कागदपत्रांसह पुरावेही सादर केले. त्यांनी ३६१ दस्तऐवजांची दोन फाईल्स ट्विट केल्या असून त्यामध्ये बिवलकर कुटुंबाला जमिनीची खैरात कशी करण्यात आली याचा तपशील आहे.

    या गंभीर आरोपांवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या नव्या वादामुळे त्यांच्यावरचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    Sanjay Shirsat Faces Allegations Over 5000 Crore Land Deal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Owaisi : असदुद्दीन ओवैसी म्हणाले- “फक्त पोस्टर नको, मोहम्मद यांचे विचारही मनात ठेवा”

    Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांचा ऐतिहासिक निर्णय- साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने; उत्सवाचा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार

    Eknath Shinde : बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; पूरस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ