प्रतिनिधी
मुंबई : बुलढाण्यानजीक समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी बसला भीषण अपघात होऊन बसणे पेट घेतल्याने 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. 8 प्रवासी जखमी झाले. या भीषण अपघातानंतर सर्व सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष कामाला लागून जखमींच्या बचाव करीत असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत मात्र पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा नॅरेटिव्ह पसरवत आहेत. Sanjay Raut’s Superstitious Narrative in Progressive Maharashtra
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा “शापित” असल्याचा जावई शोध संजय राऊत यांनी लावला आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या त्या शेतकऱ्यांच्या छापामुळेच समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत, असे अंधश्रद्धा पसरवणारे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे आणि संजय राऊत यांच्या या वक्तव्याला मराठी माध्यम शिंदे – फडणवीस सरकार वर केलेले टीकेचे स्वरूप देत आहेत.
समृद्धी महामार्गावरचा अपघात नेमका कसा झाला?, त्याविषयी पोलीस चौकशी करत आहेत. खरंच बसचा टायर फुटला की ड्रायव्हरला डुलकी लागली?, याविषयी चौकशी सुरू आहे. पोलिसांनी बसचा ड्रायव्हर दानिश इस्माईल इस्माईल शेख याला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना अनुक्रमे 5 लाख आणि 2 लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली आहे. जखमींवर सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
बस अपघाताची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर अपघात प्रतिबंधासाठी मानवी आणि तांत्रिक कोणत्या उपाययोजना करता येतील?, याची तातडीने चाचणी सुरू करून लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची खात्री त्यांनी दिली आहे.
पण या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना राजकीय टोमणे मारले आहेत. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने हडपल्या. त्या शेतकऱ्यांचे “शाप” लागले म्हणूनच समृद्धी महामार्ग “शापित” आहे आणि तिथे अपघात होतात असा जावई शोध संजय राऊत यांनी लावला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार केलेला समृद्धी महामार्ग “शापित” असल्याचे अंधश्रद्धा ते पसरवत आहेत.
Sanjay Raut’s Superstitious Narrative in Progressive Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- भीषण अपघात! समृ्द्धी महामार्गावर बस जळून खाक, २५ प्रवाशांचा मृत्यू
- पवारांना अपेक्षित अजेंडा मराठी माध्यमांनीच केला “फेल”!! वाचा, कोणता आणि कसा??
- केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवालांची सर्वोच्च न्यायालयात धाव
- मी “भोसले” नसल्याचा एक तरी पुरावा द्या, अन्यथा माफी मागा; आचार्य तुषार भोसलेंचे शरद पवारांना खणखणीत प्रत्युत्तर