• Download App
    संजय राऊत यांना पुण्यात फिरू देणार नाही; भाजपचा इशारा, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल|Sanjay Raut will not be allowed to roam in Pune; BJP's warning, lodged a complaint at the police station

    संजय राऊत यांना पुण्यात फिरू देणार नाही; भाजपचा इशारा, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

    विशेष प्रतिनिधी

    पुणे: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोथळा बाहेर काढू असे म्हटले आहे. ही एक धमकी असून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. संजय राऊत यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशाराही मुळीक यांनी दिला आहे.Sanjay Raut will not be allowed to roam in Pune; BJP’s warning, lodged a complaint at the police station

    भाजपाच्या वतीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. संजय राऊत पुणे दौऱ्यावर असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली होती. आमच्या पाठीत खंजीर खुपसला या चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाला उत्तर देत खासदार राऊत यांनी आम्ही खंजीर खुपसत नाही तर समोरून कोथळा बाहेर काढतो असे म्हटले होतं.



    त्याचा निषेध म्हणून भाजपाच्या वतीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अटक झाली होती. त्यामुळे राऊत यांनादेखील अटक करावी. जर गुन्हा दाखल केला नाही तर राज्यभरात आंदोलन करू असा इशाराही मुळीक यांनी दिला.

    Sanjay Raut will not be allowed to roam in Pune; BJP’s warning, lodged a complaint at the police station

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू