• Download App
    संजय राऊत नागपूरच्या फेऱ्या वाढवणार; कोणाला टेन्शन देणार...?? । Sanjay Raut to increase rounds in Nagpur; Who will be given tension ... ??

    संजय राऊत नागपूरच्या फेऱ्या वाढवणार; कोणाला टेन्शन देणार…??

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत हे नागपूर दौ-यावर आहेत. या दौ-या दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे नागपूरला येता आले नाही. पण,  मात्र आता हळूहळू माझ्या नागपूरच्या फेर्‍या वाढतील, असे राऊत म्हणाले. त्यांनी हे वक्तव्य करतात त्यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे याचे राजकीय तर्कवितर्क सुरू झाले Sanjay Raut to increase rounds in Nagpur; Who will be given tension … ??

    काॅंग्रेसशिवाय आघाडी नाही

    राऊतांनी काँग्रेससोबत आघाडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. राऊतांनी काँग्रेसशिवाय आघाडी बनवायची असं कधीच म्हणालो नाही,काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असं म्हटलं आहे. रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीनंतर देशात भाजपविरोधी आघाडीबाबत मोठी चर्चा सुरु आहे.याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, आघाडी वगैरे हे शब्द बदला. या देशांमध्ये तिसरी आघाडी, चौथी आघाडी, पाचवी आघाडी हे प्रयोग कधीच यशस्वी झाल्याचे दिसले नाही.



    निवडणुका आल्या की, आघाडीची चर्चा सुरू होते काल तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर साडेचार तास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. अनेक विषयांवर चर्चा केली. देशाचे राजकारण यावर सविस्तर चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमतीही झाली आहे. भविष्यातल्या राजकीय दिशा काय असावी यावरही चर्चा झाली. भविष्यात या दोन नेत्यांशिवाय इतर अनेक पक्षाचे नेते एकत्रित भेटणार आहे. आम्ही हे कधीच म्हणालो नाही की काँग्रेसशिवाय आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जींनी असे सूतोवाच केले होते, तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता ज्याने काँग्रेससोबतच नवी आघाडी बनली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते, असे राऊतांनी म्हटले आहे.

    शिवसेनेची भाषा वेगळी

    यावेळी राऊतांनी सोमय्यांसाठी वारंवार वापरल्या जाणा-या शिवराळ भाषेविषयी स्पष्टीकरण दिले. राऊत म्हणाले, जे महाराष्ट्रद्रोही आहेत आणि जे भ्रष्टाचारी आहेत, ज्याच्याविषयी महाराष्ट्र मनामध्ये कायम द्वेश आहे, अशा लोकांना जी भाषा समजते, त्या भाषेतचं बोलावं, असं आमच्या साधू संतांनी सांगितलं आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजपाचे नेते किरीट सोमय्या संजय राऊत यांच्यावरती भ्रष्टाचार केल्याचे आरोप करीत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे, त्यावर संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली. मागच्या काही दिवसांपासून राजकारणाचा स्तर घसरल्याचे, पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला एक पंरपरा आहे पण शिवसेनेची एक वेगळी भाषा आहे असंही त्यांनी सांगितलं.

    नागपूर बदललं आहे

    राऊत म्हणाले की, रविवारी पोलीस आयुक्तांना भेटलो सदिच्छा भेट होती ते मुंबईलाही अधिकारी राहिलेले आहे म्हणून नागपुरात आल्यावर त्यांना भेटलो. माहिती काढण्यासाठी मला कुठल्याही अधिकाऱ्याला भेटायची गरज नाही. त्यांच्याबद्दल सर्व काही आहे आणि त्यांच्या संदर्भात लवकरच बोलेन. शक्यतो नागपूरला येऊनच बोलेन. नागपूर नक्कीच आता बदललेला आहे. कोरोनामुळे नागपुरात येऊ शकलो नाही, मात्र आता हळूहळू माझ्या नागपूरच्या फेर्‍या वाढतील, असं राऊतांनी म्हटले आहे.

    Sanjay Raut to increase rounds in Nagpur; Who will be given tension … ??

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा