विशेष प्रतिनिधी
पुणे : कसेल त्याची जमीन, जिंकेल त्याची जागा; वज्रमुठ आघाडीत एकमेकांच्या मतदारसंघांवर तुळशी पत्र ठेवा!! अशी अवस्था आज महाविकास आघाडी झाली आहे. कारण शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्वतःच तसे ट्विट केले आहे. Sanjay Raut suggests Congress to shun its claim on pune loksabha constituency and give it to NCP
महाविकास आघाडीत पुण्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राजकीय घमासान सुरू आहे. मूळची काँग्रेसची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ताकदीच्या बळावर खेचून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. अजित दादा पवारांनी तसेच स्पष्ट बोलून दाखवले आहे आणि आता संजय राऊत यांनी करून ट्विट करून त्यात भर घातली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघ संदर्भात संजय राऊत यांनी सूचक ट्विट केले आहे. प्रत्येकाला थोडासा त्याग करावाच लागेल. जर कसेल त्याची जमीन त्याचप्रमाणे जिंकेल त्याची जागा असा निकष लावला तर कसब्याप्रमाणे पुणे जिंकू. महाराष्ट्र जिंकू. देशही जिंकू, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पण या ट्विटचा अर्थ काँग्रेसने स्वतःच्या हक्काच्या जागेवर पाणी सोडावे आणि ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःहून बहाल करावी असा निघतो आहे. फक्त राऊत यांनी प्रत्येकाला थोडा थोडा त्याग करावा लागेल असे सांगून शिवसेनेच्या नव्हे तर काँग्रेसच्या पुण्याच्या जागेवर तुळशी पत्र ठेवले आहे.
– शिवसेना हक्क सोडायला तयार नाही
मात्र हेच संजय राऊत शिवसेनेच्या 19 लोकसभा मतदारसंघांच्या जागा सोडायला तयार नाहीत. त्या सोडून बाकीच्या जागांवर चर्चा करण्याची ठाकरे गटाची तयारी आहे. स्वतः संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी तशी वक्तव्य केली आहेत. त्यामुळेच आता महाविकास आघाडीत वज्रमुठीच्या सभांच्या चर्चा सुरू असताना, कसेल त्याची जमीन जिंकेल त्याची जागा; वज्रमुठीच्या आघाडीत एकमेकांच्या मतदारसंघांवर तुळशीपत्र ठेवा!!, अशी अवस्था आली आहे.
Sanjay Raut suggests Congress to shun its claim on pune loksabha constituency and give it to NCP
महत्वाच्या बातम्या
- केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सावरकरांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- एर्दोगान पुन्हा एकदा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष, सलग अकराव्यांदा राज्याभिषेक होणार
- पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडून खेचून घ्यायचा राष्ट्रवादीचा चंग; अजितदादांचा आग्रह!!
- नव्या संसदेत सेंगोल, चाणक्य आणि अखंड भारताचा नकाशा; “कबुतरी शांती”ला फाटा देत गरुड झेपेची आशा!!