• Download App
    मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले- नारायण राणेंची उंची मोठी, पण त्यांना खातं मिळालं सूक्ष्म, लघु उद्योग! । Sanjay Raut Reaction On Modi Cabinet Expansion Greets New Ministers

    मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले- नारायण राणेंची उंची मोठी, पण त्यांना खातं मिळालं सूक्ष्म, लघु उद्योग!

    Sanjay Raut Reaction : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यातील दिग्गज नेते नारायण राणे यांना केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग खाते मिळाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला हाणला आहे. संजय राऊत म्हणाले की, नारायण राणे यांची खूप मोठी आहे, पण लघु, सूक्ष्म मध्यम असं एक खातं दिलं आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण आता लघु व सूक्ष्म खात्याचे मंत्री आहेत. Sanjay Raut Reaction On Modi Cabinet Expansion Greets New Ministers


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यातील दिग्गज नेते नारायण राणे यांना केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग खाते मिळाले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला हाणला आहे. संजय राऊत म्हणाले की, नारायण राणे यांची खूप मोठी आहे, पण लघु, सूक्ष्म मध्यम असं एक खातं दिलं आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण आता लघु व सूक्ष्म खात्याचे मंत्री आहेत.

    पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांकडून काय अपेक्षा असणार. त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे. ज्या परिस्थितीमध्ये हा देश चालला आहे, महागाई असेल, आर्थिक विषय असतील, आरोग्यविषयक आणि असेल, बेरोजगारी असेल… या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे, त्यामुळे त्यांना चेहरे मिळाले. मंत्रिमंडळाचा चेहरा हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आहे. नवीन मंत्र्यांना आम्ही शुभेच्छा देतो.

    ते पुढे म्हणाले की, शिवसेनेला फटका बसावा यासाठी राणेंना मंत्रिपद दिले असेल, तर तो कॅबिनेटचा अपमान आहे. मंत्रिपद हे राज्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी असतं. एकनाथ खडसे यांच्या ईडीकडून होत असलेल्या चौकशीवर राऊत म्हणाले की, हे जर सुडाचं राजकारण असेल, कार्यवाही असेल तर तीन पक्षाचे नेते एकत्र असतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील.

    Sanjay Raut Reaction On Modi Cabinet Expansion Greets New Ministers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उत्तराखंडच्या जंगलात भीषण आग; लष्कराला पाचारण, हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा

    शरद पवार यांचा इशारा, शशिकांत शिंदेंना अटक सहन होणार नाही; अवघा महाराष्ट्र पेटून उठेल

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता