• Download App
    Sanjay Raut Backs Aditya Thackeray's Stance on Rajya Sabha Candidate आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले - ते मोठे नेते, त्यांचा मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे

    Sanjay Raut : आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले – ते मोठे नेते, त्यांचा मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे

    Sanjay Raut

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sanjay Raut  संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेत जावे, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र त्याच वेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळाली पाहिजे, असा स्पष्ट दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर संजय राऊत यांची भूमिका मवाळ झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. मला याविषयी अधिकृत माहिती नाही. मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील आहे. उद्धव ठाकरे पक्षातून ज्यांना उमेदवारी देतील, त्यांना निवडून आणणे हे आमचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली तर त्यावर चर्चा होऊ शकते, एवढेच आपण म्हटले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. मी कोणाचे नाव ठामपणे सुचवलेले नाही. पक्ष जे ठरवेल, त्यालाच मी मान देईन, असेही त्यांनी नमूद केले.Sanjay Raut

    दरम्यान, दोन राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आल्यास पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी यांनाच पुन्हा संधी द्यावी, असे आदित्य ठाकरे यांनी मत व्यक्त केले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे मोठे नेते आहेत आणि त्यांनी मांडलेला मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे. त्यांच्या भूमिकेचा महाराष्ट्राने विचार करायला हवा, असेही त्यांनी सांगितले. एकीकडे शरद पवार यांच्या नावाची चर्चा, तर दुसरीकडे शिवसेना गटाच्या उमेदवारीचा आग्रह, या दोन्ही भूमिकांमुळे महाविकास आघाडीत उत्सुकता वाढली आहे. अंतिम निर्णय काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र राऊत यांनी पक्षनिष्ठेची भूमिका स्पष्ट करत आदित्य ठाकरे यांच्या मताला पाठिंबा दर्शवला असल्याने ठाकरे गटातील अंतर्गत मतभेदांची चर्चा सध्या तरी कमी होताना दिसत आहे.Sanjay Raut



    माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढून घेतल्याच्या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि संघावर जोरदार टीका केली.

    राऊत मालेगाव न्यायालयात हजर होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या विरोधात मंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून, त्यासंदर्भातील सुनावणीसाठी ते मालेगावात आले होते. याच वेळी त्यांनी दानवेंच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. या देशात फक्त भाजप आणि संघाच्या लोकांनाच धोका आहे, असा त्यांचा आव आणला जातो. प्रत्यक्षात त्यांना कोणी चापटीही मारणार नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. सुरक्षा हा केवळ स्वतःचे महत्त्व दाखवण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.

    कोणत्याही नेत्याने सुरक्षेचा फार बाऊ करू नये

    राऊत पुढे म्हणाले की, कोणत्याही नेत्याने सुरक्षेचा फार बाऊ करू नये. झेड प्लस, डबल झेड प्लस किंवा एनएसजी कमांडो यांची गरज फक्त भाजप, संघ किंवा शिंदे गटातील लोकांना भासते, अशी टीका त्यांनी केली. इतर पक्षांचे कार्यकर्ते निर्भय आहेत आणि त्यांच्याजवळ येण्याची कुणाची हिंमत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. सुरक्षा ठेवली काय किंवा काढली काय, त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही, असे ते म्हणाले. भाजप आणि संघाचे लोक निरर्थक आहेत, त्यांना कोणताही धोका नसताना ते स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रकार्याच्या नावाखाली सुरक्षा घेऊन स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करताना राऊत म्हणाले, त्यांचं राष्ट्रकार्य काय आहे, हे जनतेला दिसत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सुरक्षा ही गरजेपुरती असावी; पण तिचा वापर राजकीय दिखाव्यासाठी केला जाऊ नये. दानवेंची सुरक्षा काढल्यावरून निर्माण झालेला वाद हा प्रत्यक्षात सुरक्षेच्या राजकारणाचे उदाहरण आहे, असे त्यांनी सुचवले.

    Sanjay Raut Backs Aditya Thackeray’s Stance on Rajya Sabha Candidate

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवार गटाला वगळून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात परस्पर चर्चा; राज्यसभा आणि विधान परिषदेचे गणित बसवायची तयारी

    त्याग, पराक्रम आणि सेवा हे गुण समाजघडणीसाठी आवश्यक; नारी तू नारायणी परिषदेत डॉ. अनघा लवळेकर यांचे प्रतिपादन

    Maharashtra Recruitment : ५६१२ प्राध्यापकांची महाभरती, महाविद्यालयांमधील ५०१२ तर विद्यापीठांमधील ६०० पदांचा मार्ग मोकळा