• Download App
    Maharashtra Political News | The Focus India

    Maharashtra Political News

    Bachchu Kadu : ‘शिवसैनिकांनी मला जिवंत पुरले असते’; बच्चू कडूंचे गोंदियातील वक्तव्य चर्चेत, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबाबत मोठा दावा

    प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले Bachchu Kadu यांनी गोंदियातील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी जर त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला असता, तर “शिवसैनिकांनी मला जिवंत पुरले असते”, असे विधान त्यांनी केल्याचे वृत्त आहे.

    Read more

    Abhijit Dipke : ‘दिल्ली विमानतळावर गर्दी करू नका’; सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा यूटर्न, परतीपूर्वीच समर्थकांना संदेश

    दिल्लीतील कार्यक्रम आटोपून महाराष्ट्रात परतण्यापूर्वी अभिजित डिपके यांनी आपल्या समर्थकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ६ जून रोजी दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने येऊ नये आणि कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

    Read more

    ‘OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का सहन करणार नाही’; १२ जूनला राज्यभर आंदोलनाची घोषणा, सरकारला अंतिम इशारा

    महाराष्ट्रातील ओबीसी समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत राज्य सरकारला अंतिम इशारा दिला आहे. ओबीसींच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

    Read more

    Kirit Somaiya : किशोरी पेडणेकरांनी 100 कोटींचा घोटाळा केला; किरीट सोमय्या यांचा आरोप; मतीन पटेलवरील बुलडोझर कारवाईचेही समर्थन

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी 2021 मध्ये मुलुंड नाट्यगृह संकल्प व अंधेरी संकुल हे 15 वर्षांसाठी भाड्याने देऊन जवळपास 100 कोटींचा घोटाळा केला, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे किशोरी पेडणेकरांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

    Read more

    Sharad Pawar : शरद पवारांची सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी; मोदींना म्हणाले- राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय – प्रक्रिया राबवा

    मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य आणि अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्याची परिस्थिती चिंताजनक असून केंद्र सरकारने अधिक जबाबदारीने पावले उचलण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

    Read more

    CM Devendra Fadnavis : राहुल गांधी देशाच्या राजकारणातील रिजेक्टेड माल; CM देवेंद्र फडणवीस म्हणाले – आम्ही त्यांना महत्त्व देत नाही

    महाराष्ट्राला ‘ट्रिलियन डॉलर’ इकॉनॉमी बनवण्याच्या दिशेने सरकार वेगाने पावले उचलत असून, त्याचा मोठा फायदा सर्वसामान्यांना मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज ‘सीआयआय’च्या (CII) वार्षिक बैठकीतनंत माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्योगांसाठी आणि घरगुती ग्राहकांसाठी वीज दरात मोठी कपात होणार असल्याची माहिती दिली. तसेच, इंधन बचतीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींचा ‘रिजेक्टेड माल’ असा उल्लेख करत, आम्ही त्यांना महत्त्व देत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

    Read more

    Sanjay Raut : आदित्य ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले – ते मोठे नेते, त्यांचा मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे

    संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेत जावे, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र त्याच वेळी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळाली पाहिजे,

    Read more

    Sanjay Raut : संजय राऊतांनी टोचले ठाकरे बंधूंचे कान; म्हणाले – ‘महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते’

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पक्षाच्या हाराकिरीवरून थेट ठाकरे बंधूंचे कान टोचण्याचे धाडस दाखवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत राज व उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. आत्मविश्वास अनेक प्रकारचा असतो. पैशांचा, सत्तेचा, बळाचा व ज्ञानाचा. पण मूर्खपणाचा आत्मविश्वास सर्वोपरी म्हणजे सर्वोच्च असतो, असे ते विरोधकांचे अधिकारवाणीने कान टोचत म्हणालेत.

    Read more

    Rahul Narwekar : त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही माझे नाव जोडू नये, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात राहुल नार्वेकर व त्यांच्या सहकाऱ्यांशी एक महिला व व्यक्ती वाद घालताना दिसून येत आहेत. राहुल नार्वेकरांनी ही घटना कुठे व का घडली हे सांगावे अन्यथा मी ती सांगेन, असा इशाराही राऊत यांनी या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना दिला होता. आता यावर राहुल नार्वेकरांनी ट्विट करत या प्रकरणी खुलासा केलया आहे.

    Read more

    Girish Mahajan : ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणतायत, पण कशासाठी?:भाषणात बाबासाहेबांचे नाव घेण्याचे अनावधानाने राहिले; गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

    प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात?”

    Read more

    Nana Patole : नाना पटोलेंनी राहुल गांधींची तुलना श्रीरामांशी केली; म्हणाले- राहुल गांधींचे काम प्रभू रामचंद्रांसारखेच!

    काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्याची तुलना प्रभू श्रीरामांच्या कार्याशी केल्याने राज्याच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे. प्रभू रामचंद्रांचे काम शोषित व पीडितांची सेवा करणे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे होते.

    Read more