• Download App
    संजय राऊत झाले आता पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; कराड जनता बँकेच्या संचालकांची चौकशी!!|Sanjay Raut now ED raids on Pawar's close associates; Investigation of directors of Karad Janata Bank!!

    संजय राऊत झाले आता पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; कराड जनता बँकेच्या संचालकांची चौकशी!!

    प्रतिनिधी

    सातारा : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक केल्यानंतर आता फक्त सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने आपला मोर्चा पवारांच्या निकटवर्तीयांकडे वळवला आहे.कराड जनता बँकेत बेकायदा कर्ज वाटप केल्या प्रकरणी ईडीने छापे घातले आहेत. कराड जनता बँकेत शेकडो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कराडमधील राजेंद्र पाटील यांनी ही तक्रार केली होती.Sanjay Raut now ED raids on Pawar’s close associates; Investigation of directors of Karad Janata Bank!!

    कराड जनता बँकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. संचालकांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय संचालक अधिक असल्याने या कारवाईची जोरदार चर्चा होत आहे. अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या गुरु कमोडिटीज या कंपनीने खरेदी केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही यातून बेकायदा कर्ज दिले आहे.



    शालिनीताई पाटील यांनी स्थापन केलेल्या पण नंतर अजित पवारांचे निकटवर्ती गुरु कमोडिटीज कंपनीने खरेदी केलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही या बँकेतून बेकायदा कर्ज दिल्याची माहिती राजेंद्र पाटील यांनी ईडीकडे दिली आहे. या तक्रारीवरून बँकेतील संबंधितांकडे कसून चौकशी सुरू आहे. अस्तित्वात नसलेल्या लोकांच्या नावे कर्ज वाटप केल्याचीही यामध्ये तक्रार करण्यात आली आहे. बँकेच्या संचालकांकडे याबाबत चौकशी सुरू आहे या चौकशीतून नेमके काय बाहेर येतं हे पाहण महत्वाचे आहे.

    बँकेच्या मुख्य कार्यालयात ईडीच्या अधिकारी दिवसभर ठाण मांडून होते. बँकेच्या कर्ज व्यवहारांची चौकशी केली. तीन दिवसापूर्वी अवसायानिक मनोहर माळी यांच्याकडेही ईडीने कर्ज वसुलीच्या सध्यस्थितीचा अहवाल मागवला आहे. ईडी कार्यालयात तत्पूर्वी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सुर्यवंशी यांच्याकडेही तब्बल 10 तासाहून अधिक काळ चौकशी झाली आहे.

    कराड जनता बँकेच्या कर्ज व्यवहारांची ईडीतर्फे चौकशी सुरू आहे. त्यानुसार अवसायानिक म्हणून माझ्याकडून त्या कर्ज कशी वितरीत केली, यासह त्या व्यवहारांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यानुसार त्यांनी व्यापक अहवाल मागविला आहे. तो लवकरच ईडीला देण्यात येणार आहे. असे बँकेने स्पष्ट केले.

    Sanjay Raut now ED raids on Pawar’s close associates; Investigation of directors of Karad Janata Bank!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !