• Download App
    Sanjay Raut : शरद पवार यांच्या भेटीला संजय राऊत ; नेमकी चर्चा कशावर ? । sanjay raut meets sharad pawar

    Sanjay Raut : शरद पवार यांच्या भेटीला संजय राऊत ; नेमकी चर्चा कशावर ?

    • संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला
    • सुप्रिया सुळेही उपस्थित
    • एसटी संपाबाबत चर्चा ?

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. वाय. बी. सेंटरमध्ये संजय राऊत व शरद पवार यांच्यात बैठक होत आहे. संजय राऊत अचानक पवारांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. sanjay raut meets sharad pawar

    सोमवारी मुंबईमध्ये वरळी येथील सेंट्रल हॉटेलमध्ये शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एसटी संपाच्या मुद्द्यावरुन बैठक झाली.



    एसटी संपाबाबत शरद पवारांनी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. आज संजय राऊतही शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत.

    त्यामुळं शरद पवार आज पुन्हा एकदा पवार एसटी संपाबाबत चर्चा करणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे. तसंच, एसटी महामंडळाचे विलीनीकरणाच्या मुद्द्यांवरही दोघा नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    sanjay raut meets sharad pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shaktipeeth Expressway शक्तिपीठ मार्गावरून फडणवीसांच्या धमकीमुळे पवारांची झोप उडाली; पण मोदींनी त्यात लक्ष घातल्यावर पवारांचे काय उडेल??

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!

    Malegaon sugar factory election result 2025 अजितदादांना नको असलेले चंद्रराव तावरे विजयी; माळेगावच्या कारखान्यात चालणार नाही मनमानी!!