विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय – सामाजिक जीवनात मोठी उलथापालथ होत असताना दोन अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांची भेट झाल्याची बातमी आज समोर आली.
शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरी आज भेट दिली. “नरकातला स्वर्ग” या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभाचे निमंत्रण त्यांनी शरद पवारांना दिले. स्वतः शरद पवारांनी x अकाउंट वर ही माहिती दिली.
संजय राऊत मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली काही दिवस तुरुंगात होते. तिथे त्यांना वेगवेगळे अनुभव आले. या वेगवेगळ्या अनुभवांवर आधारित त्यांनी पुस्तक लिहिले असून त्या पुस्तकाला त्यांनी “नरकातला स्वर्ग” असे नाव दिले आहे. लवकरच या पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ होणार असून त्याचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी “नरकातला स्वर्ग” या पुस्तकाची प्रत शरद पवारांना भेट दिली. त्याचबरोबर प्रकाशन समारंभाचे निमंत्रण दिले.
यावेळी संजय राऊत आणि शरद पवार यांच्यामध्ये रोहन तावरे यांनी वन्य जीवनावर लिहिलेल्या पुस्तकावरही सविस्तर चर्चा झाली. देशातल्या आणि राज्यातल्या विविध मुद्द्यांवर या दोघांनी मंथन केले. शरद पवारांनी संजय राऊत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Sanjay Raut invite Sharad Pawar for publication of his book “Narkatala Swarg”
महत्वाच्या बातम्या
- प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’
- Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा
- Tejashwi Yadav : आता तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!
- Ganga Expressway : हवाई दलाने रचला विक्रम : गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे रात्रीचे लँडिंग