• Download App
    लाचखोरीच्या प्रकरणात चौकशी सुरू असतानाच समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली यावर संजय राऊत यांनी केली टीका | Sanjay Raut criticizes Sameer Wankhede for getting Z-plus security while probe into bribery case

    लाचखोरीच्या प्रकरणात चौकशी सुरू असतानाच समीर वानखेडे यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली यावर संजय राऊत यांनी केली टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर नुकताच लाच घेतल्याचा गंभीर आरोप झाला होता. याप्रकरणी इंटरनल इन्व्हेस्टिगेशन सुरू असतानाच त्यांना केंद्र सरकारद्वारे झेड प्लस सिक्युरिटी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या झेड प्लस सुरक्षा वरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र जोरदार टीका केली आहे.

    Sanjay Raut criticizes Sameer Wankhede for getting Z-plus security while probe into bribery case

    सध्या केंद्र सरकार महाराष्ट्राला, महाराष्ट्र राज्याला बदनाम करणाऱ्या लोकांना झेड प्लस सुरक्षा देत आहे. अशाप्रकारे केंद्र सरकार एक प्रकारे त्यांचा सन्मानच करत आहे. मात्र झेड प्लस सुरक्षा पुरवली म्हणजे चौकशी होणार नाही, असे नाही. समीर वानखेडे यांची चौकशी नक्की होणार. असे मत संजय राऊत यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले आहे.


    “नवाब मलिक यांनी सांगितलेली गोष्ट इंटरव्हलपर्यंतची; त्या नंतरची पुढची गोष्ट मी सांगेन” , संजय राऊत यांनी दिला सूचक इशारा


    पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र हे एक सुरक्षित राज्य आहे. इथे लोक अतिशय सुरक्षित आहेत. जर एखाद्या अशा व्यक्तीला सुरक्षा मिळत असेल तर केंद्र सरकारकडे खूप सुरक्षा आहे असे दिसते. तर ही सुरक्षा केंद्र सरकारने जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पाठवावी. तिथे सुरक्षिततेची गरज सर्वाधिक आहे. असे संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे.

    ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारवर चिखलफेक केली जात आहे. त्यावरून हे जणू काही महाराष्ट्रात आणि मुंबईत गांजा आणि अफूची शेती पिकते आणि ते कापून आम्ही आमच्या गच्ची आणि टेरेसवर ठेवतो असा चालले आहे. या सर्व गोष्टींचा उध्दव ठाकरे सरकारला कोणताही धोका नाही. हा रडीचा डाव बंद करा.असा इशारादेखील संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.

    Sanjay Raut criticizes Sameer Wankhede for getting Z-plus security while probe into bribery case

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : …तर प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिशील अन् पारदर्शी होणार – देवेंद्र फडणवीस

    Birdev Done IPS बिरदेव डोणेची सजवलेल्या जीपमधून हजाराेंच्या उपस्थितीत मिरवणूक

    Chief Minister Fadnavis : विकासाच्या इकोसिस्टीमुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री फडणवीस