• Download App
    Sanjay Nirupam: Thackeray Alliance Selfish, Not Mahavikas Aghadi संजय निरुपम म्हणाले- महाविकास आघाडी नव्हे त

    Sanjay Nirupam : संजय निरुपम म्हणाले- महाविकास आघाडी नव्हे तर ठाकरे विकास आघाडी; दोन्ही पक्ष स्वार्थासाठी एकत्र

    Sanjay Nirupam

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sanjay Nirupam महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एकत्र येत विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. या मेळाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता संजय निरुपम (  Sanjay Nirupam ) यांनी देखील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. महाविकास आघाडी नव्हे तर आता ठाकरे विकास आघाडी तयार झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.Sanjay Nirupam

    संजय निरुपम म्हणाले, काल जे काही झाले, ठाकरे बंधू एकत्र आले आणि महाविकास आघाडीचे जे काही लोक होते ते तिथे सगळे जमले होते. कॉंग्रेस वगळता तो एक नवीन महाविकास आघाडीचा चेहरा होता. महाविकास आघाडी जी आहे ती आता ठाकरे विकास आघाडीमध्ये रूपांतरित झाली आहे. तिथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक, भाकपचे लोक, महादेव जानकर यांच्यासारखे जे लोक उपस्थित होते, त्यांच्या उपस्थितीत आता महाविकास आघाडीचे ठाकरे विकास आघाडी झाले आहे.



    पुढे बोलताना संजय निरुपम म्हणाले, दोन्ही पक्षांची हालत खराब आहे. राज ठाकरे यांचा जो पक्ष आहे त्याचा आता फक्त 2 टक्के व्होट बँक राहिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची स्थिती सुद्धा खराब आहे. जेव्हापासून ते भाजपपासून लांब गेले आहेत. कॉंग्रेससोबत युती केल्यानंतर जी काही परिस्थिती झाली आहे आणि कॉंग्रेसची पण काय परिस्थिती झाली आहे बघून घ्या. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतःच्या स्वार्थापोटी हा निर्णय घेतला आहे, असे निरुपम यांनी म्हटले.

    राज ठाकरे यांच्यावर टीका करताना संजय निरुपम म्हणाले, राज ठाकरे यांनी घोषणा केली की जे मराठी बोलण्यास नकार देतात त्यांना मारा पण त्याचे व्हिडिओ काढू नका. हे चुकीचे आहे. मी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारतो की हे उचित आहे का? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्रिभाषा सूत्राच्या विरोधात जाऊन यांनी मराठी तरुणांचे व महाराष्ट्राचे नुकसान केले आहे.

    Sanjay Nirupam: Thackeray Alliance Selfish, Not Mahavikas Aghadi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधूंची दादागिरी नाकारता, पण हिंदी भाषकांची मस्तवाल मुजोरी का खपवून घेता??

    CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पॉडकास्ट; महाराष्ट्राच्या भूमीचे सांगितले पौराणिक महत्त्व, वारीवरही भाष्य

    Ashish Shelar : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर आशिष शेलारांची टीका- एकाचे भाषण अपूर्ण तर दुसऱ्याचे अप्रासंगिक