विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Gaikwad आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर आज अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. यामुळे त्यांच्या अडचणींत मोठी भर पडण्याची शक्यता आहे. पण गायकवाड यांनी चांगल्या कामासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आपल्याला त्याची परवा नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.Sanjay Gaikwad
आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad ) यांनी गत मंगळवारी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यांनी आपल्याला या कॅन्टीनमधून शिळे अन्न मिळाल्याचा आरोप केला होता. या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले. पोलिसांनी या प्रकरणाची निश्चितपणे चौकशी केली पाहिजे. अशा प्रकारच्या घटनांसाठी कोणतीही औपचारिक तक्रार आवश्यक नसते. गुन्हा दखलपात्र असेल, तर पोलिस स्वतःहून कारवाई करू शकतात, असे ते म्हणाले होते.Sanjay Gaikwad
मरीन ड्राईव्ह अदखलपात्र गुन्हा
मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. सोशल मीडियातील व्हिडिओ व पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता या गुन्ह्याची माहिती पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना कळवली जाणार आहे. सेक्शन 352, 115 (2) अंतर्गत ही एनसी दाखल करण्यात आली आहे. यामुळे आमदार गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आय डोन्ट केअर – गायकवाड
दुसरीकडे, संजय गायकवाड यांनी आपल्याला अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्याची काळजी नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. ते म्हणाले, मी कोणताही मोठा गुन्हा केला नाही. मी चांगल्या गोष्टीसाठी सौम्य मारहाण केली. चांगल्या गोष्टीसाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आय डोन्ट केअर.
गुन्हा दाखल झाला, तर मी सामोरा जाईन. गंभीर काहीच नाही. मेडिकल कुणाचेही झाले नाही. कुणी जखमी नाही. गंभीर मारहाण नाही. सौम्य मारहाण आहे. माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय का? करप्शनचा गुन्हा दाखल झालाय का? माझ्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि तो मी मान्य करत आहे. माझ्या माहितीनुसार, असा गुन्हा दाखल करण्याचा किंवा तक्रारीचा पोलिसांना अधिकार नाही.
302, 307चा गुन्हा असेल, तर त्यात पोलिस फिर्यादी होऊ शकतात. माझ्या प्रकरणात कुणीही किंवा मार खाणाऱ्याने तक्रारच दिली नाही. सरकार अडचणीत येणासारखा हा एवढा मोठा विषय आहे का? एक सौम्य मारहाणीचा विषय आहे. महाराष्ट्राचे नुकसान होणार आहे, एवढा काय मोठा मुद्दा आहे का? विरोधकांनी हा मुद्दा मोठा समजला. ते नालायक आहेत, असे ते म्हणाले.
गायकवाडांना मारहाणीचा पश्चाताप नाही
उल्लेखनीय बाब म्हणजे संजय गायकवाड यांनी यापूर्वीच आपल्याला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे स्पष्ट् केले आहे. माझा मार्ग चुकला असला तरी, मी जे केले त्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. किंबहुना मी मारहाण केल्यामुळेच निकृष्ट अन्न पुरवणाऱ्या कॅन्टीवर कारवाई झाली. मी फक्त जराशी मारहाण केली. त्यामुळे एनसी होऊ शकते. हा फार मोठा गुन्हा नाही. मलाही कायदा माहिती आहे. मी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून माहिती देणार आहे. त्यांना मी दोषी वाटत असेन तर मी ते देतील ती शिक्षा भोगायला तयार आहे, असे ते म्हणाले होते.
Sanjay Gaikwad Booked for Canteen Assault; Says ‘I Don’t Care’
महत्वाच्या बातम्या
- UNESCO’s : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीच्या गडकिल्ल्यांचा समावेश
- Hassan : कर्नाटकच्या हासनमध्ये 40 दिवसांत हार्ट अटॅकने 30 जणांचा मृत्यू; लोकांमध्ये घबराट
- Ajit Doval अजित डोवालांनी पाश्चात्त्य माध्यमांच्या गळ्यात घातली त्यांचीच बेजबाबदारी; भारताच्या नुकसानीचे पुरावे मागून केली आरोपांची चाळणी!!
- Udaipur Files : कन्हैयालाल हत्याकांडावर बनलेल्या चित्रपटावर दिल्ली हायकोर्टाची बंदी; याचिकाकर्त्याने 2 दिवसांत केंद्राकडे आक्षेप नोंदवावा