विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : जिकडे तिकडे चोहीकडे धुके, धुके आणि सोबत गुलाबी थंडी. धुक्यात हरवलेली झाडी निसर्ग हे निसर्गाचे मनमोहक रूप डोळ्यात साठवून ठेवण्याची इच्छा प्रत्येक पर्यटकांच्या मनात तयार होईल, अशीच काहीशी परिस्थिती आता संगमनेरमध्ये तयार झाली आहे.
आपण संगममेरमध्ये आहोत की महाबळेश्वर की काश्मीर असाच प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही.निसर्गाचे हे सौंदर्य सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. परंतु हे धुक्याचे वातावरण शेतकऱ्यांच्या पिकांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेले भांडवल सुद्धा अशा वातावरणाने वसूल होणार नाही. सरकार सोबत निसर्ग शेतकऱ्याची परीक्षा घेत आहे. निसर्गाने काहीतरी कृपा करावी आणि आमचे शेतमाल जोमात यावेत अशी भावना शेतकरी वर्गातून येत आहे.मात्र या धुक्यासह पडलेल्या गुलाबी थंडीमुळे संगमनेरचे महाबळेश्वर झाल्याचे दिसते आहे.
- धुक्यात हरवला संगमनेर तालुका..!
- काश्मीर,महाबळेश्वरला आल्यासारखे वाटते
- गुलाबी थंडी, धुक्याचा आनंद घेता येणार
- निसर्गाचे हे सौंदर्य सध्या महाराष्ट्रात दिसतेय
- धुक्याचे वातावरण पिकासाठी मात्र धोकादायक