विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. हास्यजत्रेचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. या कार्यक्रमातील लोकप्रिय चेहरा म्हणजे समीर चौगुले. समीर केवळ अभिनेता नाही तर तो या कार्यक्रमात लेखक म्हणूनही जबाबदारी सांभाळतो. त्याची प्रत्येक भुमिका प्रेक्षकांना खुप हसवते.Samir Choughule: New.
मात्र समीर चौघुलेच्या एका पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्याने एका लोकप्रिय अभिनेत्रीसाठी खास पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये समीरनं तिच्या काही आठवणी सांगत तिचे आभार मानले आहे. इतकच नाही तर तिचे खुप कौतुकही केले आहे. ती अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
हेही वाचा: Lalbaug Cha Raja: लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या गर्दीत फराह खान, सोनू, मानुषीचे ‘हाल’! व्हिडिओ व्हायरलसमीर चौघुलेंनी सोनाली कुलकर्णीसोबतचा एक फोटो शेयर करत एक लांबलचक पोस्ट शेयर केली आहे. खर तर सोनालीनं समीरला चार्ली चॅप्लिनची मुर्ती भेट दिली. त्याचा फोटो शेयर करत समीर त्यांच्या कॅप्शनमध्ये लिहितो की, “कलाक्षेत्रात एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे अत्यंत हृदयापासून खुल्या दिलाने कौतुक करणे ही गोष्ट तशी विरळच.. माझ्या 29 वर्षाच्या कारकिर्दीत मी सहकलाकारांनी माझ्यावर केलेले निस्सीम प्रेमही अनुभवले आणि ईर्षा, जेलसी, इनसिक्युरिटी हे प्रकारसुद्धा अगदी जवळून बघितले…अनुभवले..
आपल्याला इतरांच्या यशाचा जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आपल्या यशाचा इतरांना होतो का? हा प्रश्न बरेचदा मला पडायचा…आपल्या जवळचे अनेक जण सोशल मीडियावर आपल्याबद्धल खूप वेगळे react होतात..पण प्रत्यक्षात मात्र त्यांचं खरं स्वरूप अत्यंत वेगळं असतं…पण शेवटी हे सगळ कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग म्हणून मी ग्रेसफुली स्वीकारायला ही शिकलो..असे प्रकार कदाचित फक्त आमच्या कलाक्षेत्रापुरत मर्यादित नसावेत..या पार्श्वभूमीवर SonaliKulkarni सारखे कलाकार असतात. देवाने ज्यांच्या शरीरात काळजा ऐवजी नदीचे विशाल पात्र बसवलेले असते..
Samir Choughule: New.
महत्वाच्या बातम्या
- मीडिया टायकून रूपर्ट मर्डोक यांचा फॉक्स आणि न्यूज कॉर्पचा राजीनामा; 70 वर्षे राहिले अध्यक्ष, मुलाला दिली जबाबदारी
- देवेंद्र 24×7 सामाजिक कामात, पण त्याने स्वतःसाठी एक दिवस तरी द्यावा, वेड्या बहिणीची वेडी ही माया!!
- केजरीवालांच्या अडचणी वाढणार? दिल्ली ‘CM House’च्या नूतनीकरण प्रकरणी CBI चौकशी करणार!
- खलिस्तानी आणि गँगस्टर्सच्या विरोधात ‘NIA’ची मोठी कारवाई; सात राज्यांत ५३ ठिकाणी छापे, अनेकांना अटक!