राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आज (२७ ऑक्टोबर, बुधवार) पत्रकार परिषदेला संबोधित करताना दावा केला की, २ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने ज्या क्रुझवर छापा टाकला, त्या क्रुझमध्ये मोठा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. Sameer Wankhede connection with international drug mafia and trap of aryan khan in mumbai cruise allegations by nawab malik
वृत्तसंस्था
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आज (२७ ऑक्टोबर, बुधवार) पत्रकार परिषदेला संबोधित करताना दावा केला की, २ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने ज्या क्रुझवर छापा टाकला, त्या क्रुझमध्ये मोठा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता.
माफियासोबत त्याची माशुका होती जिच्या हातात धोकादायक शस्त्रे होती. तो दाढीवाला माफिया क्रूझमध्ये नाचत होता. तो पकडला गेला नाही. त्याला सोडण्यात आले. क्रूझमधील 1300 लोकांची चौकशी झाली नाही. मात्र सापळा रचून फक्त आर्यन खान व इतरांना पकडण्यात आले.
दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र
क्रूझमध्ये नाचणारा आंतरराष्ट्रीय माफिया समीर वानखेडेचा मित्र असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. त्यांनी तिहार तुरुंगात शिक्षा भोगली आहे. राजस्थानमधील तुरुंगात वास्तव्य केले आहे. तो दुबईत ड्रग्ज टुरिझम चालवतो. एनसीबीची इच्छा असल्यास, कार्डिला क्रूझ सीसीटीव्ही मिळवून पाहू शकतात. मी वैयक्तिकरीत्या त्याचे नाव आणि इतर तपशील NCB अधिकाऱ्यांसोबत शेअर करू शकतो. कारवाई झाली नाही तर जाहीरही करेन. एवढा मोठा माफिया तिथे ड्रग्ज विकून गेला. आर्यन खानला फ्रेम करण्यात आले आहे, असा आरोपही त्यांनी केला
नवाब मलिक म्हणाले की, क्रूझमधील त्या आंतरराष्ट्रीय माफियाच्या मेहबुबाच्या हातात बंदूक आहे. व्हिडिओत ती नाचताना दिसत आहे. दाढीवाला माफिया मध्यभागी नाचत आहेत. व्हिडिओ माझ्याकडेही आहे. एनसीबी क्रूझकडून त्याचे सीसीटीव्ही मिळवू शकते. अशी पार्टी क्रूझमध्ये आयोजित करण्यास परवानगी नव्हती. कोविडचे नियम लागू होते. नियमांची पायमल्ली करण्यात आली. पण मी आजही म्हणतो की क्रूझमध्ये छापा पडला नाही. आंतरराष्ट्रीय माफियांना मोकळे सोडले. क्रूझ सोडून ही कारवाई क्रूझच्या बाहेरच झाली. एनसीबी कार्यालयात घडली. समीर वानखेडेने माफियांशी मैत्री केली. आर्यन खानला सापळा रचून पकडले. कारण त्यांचा वसुलीचा हेतू होता.
Sameer Wankhede connection with international drug mafia and trap of aryan khan in mumbai cruise allegations by nawab malik
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मी्र खोऱ्यात ग्रेनेड हल्ल्यात ६ जखमी, लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न
- चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा लागला वाढू, लांझोऊ शहरात लॉकडाउन
- साक्षीदारांना संरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे योगी सरकारला आदेश
- बंगळूरमधील रोहिंग्यांच्या हद्दपारीची योजना नाही , कर्नाटकची न्यायालयात माहिती
- अफगाणिस्तानला मदत पाठवण्याचे आता इम्रान, जीनपिंग यांचे थेट जगालाचा साकडे