• Download App
    आरक्षण कधी देताय सांगा, वेठीस धरू रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा|Sambhaji Raje Chhatrapati warns Chief Minister, Tell me when to make a reservation, don't hold on to the road

    आरक्षण कधी देताय सांगा, वेठीस धरू रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा आज माजी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? त्यासाठी काय करत आहात? कधीपर्यंत आरक्षण देताय, हे समाजाला सांगा. त्यांना वेठीस धरून रस्त्यावर उतरायला लावू नका. आता घोषणा नकोय, लवकरात लवकर प्रत्यक्ष कृती करा, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.Sambhaji Raje Chhatrapati warns Chief Minister, Tell me when to make a reservation, don’t hold on to the road

    मराठा क्रांती मोर्चाच्या 5 व्या वर्धपान दिनानिमित्त हर्सूल येथील मधुरा लॉन्समध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजीराजे म्हणाले, १९०२ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी वंचित बहुजनांना आरक्षण लागू केले होते. पण गोरगरीब मराठा समाजाला यापासून वंचित ठेवण्यात आले. त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मी २००७ पासून प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.



    महाराष्ट्र पिंजून काढला आहे. संसदेत सर्वप्रथम मराठा आरक्षणासाठी मीच आवाज उठवला. १२७ वी घटना दुरूस्तीवर परखड मत मांडले. उर्वरित खासदार गप्प होते. त्यांनी असे तोंडावर बोट ठेवायला नको. आग्रा भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबच्या दरबारात अन्याय विरोधात आवाज उठवला होता. तसेच मराठा समाजावर होणाºया अन्याय विरोधात मी संसदेत एकटा बोललो व पुढेही बोलत राहील. तुम्ही कोणत्याही पक्षात असू द्या, समाजासाठी मात्र, एकत्रित येण्याची त्यांनी आवाहन केले.

    मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिव धर्म यात्रा काढली होती तेव्हा त्यांच्या सोबत होतो, आजही आहे. जेथे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे व समाजहिताचे काम आहे तेथे मी सर्वांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना इतिहासाबाबत प्रश्न विचारले पाहिजे असेही ते म्हणाले.

    फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. तसेच विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे यांनी तिच घोषणा केली. त्यामुळे आपण आरक्षण कशातून हवे हे सांगत बसू नका व मतभेद न ठेवता, त्या सत्ताधारी व विरोधकांनी बोलल्याप्रमाणे कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे आवाहन केले.

    Sambhaji Raje Chhatrapati warns Chief Minister, Tell me when to make a reservation, don’t hold on to the road

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस