• Download App
    संभाजी ब्रिगेडची येत्या ३० डिसेंबर रोजी मुंबईत बैठक होणार ; महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करणार | The Focus India

    संभाजी ब्रिगेडची येत्या ३० डिसेंबर रोजी मुंबईत बैठक होणार ; महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करणार

    मराठा आरक्षण मोर्चानंतर संभाजी ब्रिगेड संघटनेत मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते जोडले गेले आहेत.Sambhaji Brigade to meet in Mumbai on December 30; Municipal Corporation will announce its decision to contest the election


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ३० डिसेंबर रोजी संभाजी ब्रिगेडची मुंबईत रंगशारदा सभागृहात बैठक होणार आहे. यात महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमिवर संघटनेची राजकीय भूमिका जाहीर केली जाणार आहे.यावेळी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते येणार असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे.पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान राज्यातील १५ महापालिका तर सुमारे १०० हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.



    या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनेही दंड थोपटले आहेत.मराठा आरक्षण मोर्चानंतर संभाजी ब्रिगेड संघटनेत मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते जोडले गेले आहेत. संघटनेने महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यास राज्यभरातील मोठ्या पक्षांसाठी ही डोकेदु:खी ठरणार आहे.

    ३० डिसेंबर रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात महत्वपूर्ण निर्णय होणार आहे. हा मेळावा म्हणजे संभाजी ब्रिगेडचं शक्तिप्रदर्शन असणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या मेळाव्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    Sambhaji Brigade to meet in Mumbai on December 30; Municipal Corporation will announce its decision to contest the election

    Related posts

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!