विशेष प्रतिनिधी
मुंबई : Samarjeetsinh Ghatge राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त देखील ठरला असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल, असे विधान पाटील यांनी केले आहे.Samarjeetsinh Ghatge
गेल्या अनेक दिवसांपासून समरजित घाटगे हे शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. घाटगे हे पुन्हा एकदा भाजपच्या ब्रॉड कोल्डमध्ये आलेले आहेत. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल, असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच घाटगे यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढवणार असल्याची माहिती देखील चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. तसेच समरजित घाटगे हे महायुतीच्या बैठकीला देखील उपस्थित असल्याचे समजते.Samarjeetsinh Ghatge
विधानसभेच्या वेळी केला होता शरद पवार गटात प्रवेश
कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर, समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी आक्रमकपणे निवडणूक लढवली, मात्र या थेट लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीतील या पराभवानंतर घाटगे यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच स्थानिक राजकारणात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले.
अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष बाजूला सारून, कागल नगरपरिषद निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांनी ऐतिहासिक आघाडी केली. या नव्या समीकरणाने निवडणुकीत मोठी किमया साधली असून, शिवसेना शिंदे गटाचा दारुण पराभव करत मुश्रीफ-घाटगे आघाडीने 23 पैकी 23 जागांवर विजय मिळवून पूर्ण ‘व्हाईट वॉश’ केला आहे. नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने यांची निवड झाली असून, या एकतर्फी विजयामुळे कागलमधील दोन्ही दिग्गज नेत्यांच्या एकत्र येण्यावर मतदारांनी मोहोर उमटवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Samarjeetsinh Ghatge to Rejoin BJP: Only Technicalities Left, Says Chandrakant Patil
महत्वाच्या बातम्या
- दोन पवार एकत्र येतील, पण ते पुणे जिल्हा परिषदेच्या पलीकडे जातील का??
- झ्युरिक मधल्या विवानचे फडणवीस झाले फॅन; लाडक्या बहिणींबरोबरचा फोटो आणि व्हिडिओ देखील केला शेअर!!
- CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना
- Trump : ट्रम्प यांनी 8 युरोपीय देशांवर 10% टॅरिफ लावले, ग्रीनलँडवर ताबा मिळवण्यास विरोध करत होते