प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटच्या देवाचा पुतळा उभारलाय. कर्नल सी. के. नायडूंनंतर सचिन तेंडुलकरला हा मान मिळालाय!! sachin tendulkar statue in mumbai wankhede stadium
विख्यात क्रिकेटपटू, भारतीय क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले.
या सोहळ्यास भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआयचे खजिनदार आमदार ॲड. आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे, सचिव अजिंक्य नाईक, सहसचिव दीपक पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
वानखेडे स्टेडियमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने महान फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा हा २२ फुटी पुतळा उभारण्यात आला असून आंतरराष्ट्रीय मूर्तीकार प्रमोद कांबळे यांनी तो तयार केला आहे.
याआधी फक्त कर्नल सी के नायडू यांचाच पुतळे नागपूर, हैदराबाद आणि इंदोर मध्ये तीन वेगवेगळ्या स्टेडियम मध्ये उभारण्यात आले आहेत. त्यानंतर पुतळा उभारण्याचा मान सचिन तेंडुलकरला मिळाला आहे.
sachin tendulkar statue in mumbai wankhede stadium
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न तरी सत्ताधारी आमदारांचे उपोषण का??; अजितदादांच्या कानपिचक्या!!
- कंत्राटी भरतीचा शासन निर्णय अखेर रद्द; महाविकास आघाडीने नेमलेल्या एजन्सीला महायुतीचा मोठा दणका!
- पीयूष गोयल यांच्या फोनवरही आले नोटिफिकेशन, ‘Apple’ला उत्तर द्यावे लागेल – राजीव चंद्रशेखर
- दहशतवादी हल्ल्यात हेडकॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली; तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना