• Download App
    रुपाली पाटील यांचा मनसेला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार|Rupali Patil's Jay Maharashtra to MNS, will join NCP

    रुपाली पाटील यांचा मनसेला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील विश्वासू सहकारी आणि आक्रमक नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्या उपमुख्यमंत्र२ी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.Rupali Patil’s Jay Maharashtra to MNS, will join NCP

    राज ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा पाठविला आहे. अतिशय भावनिक शब्दांत लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राजसाहेब आपण कायम माझ्या हृदयात राहाल. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.



    पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत.रुपाली पाटील या राज ठाकरे यांच्या विश्वासू सहकारी होत्या.

    महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची बाजू त्या हिरहिरीने प्रसारमाध्यमांसमोर मांडायच्या. पुणे महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना मनसेसाठी पयार्याने राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

    Rupali Patil’s Jay Maharashtra to MNS, will join NCP

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा