विशेष प्रतिनिधी
जालना – विमान प्रवासासाठी RTPCR चाचणीचा अहवाल बंधनकारक आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. RTPCR test report mandatory for air travel: Health Minister Rajesh Tope
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अधिकाऱ्याची ओमीक्रोन संदर्भात बैठक घेतली या बैठकित कोरोना टेस्टिंग, ज्यूनिमिक सिकवेंसिंग लॅब वाढवणे, सर्व विमानतलावर १३ देशातून येणाऱ्या प्रवाशांना कवारंटाईन करणे,या व्हेरीयंट बद्दल जनजागृती करणे,लसीकरण वाढवन्याबाबत आदेश देण्यात आल्याची महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रात सध्या रुग्ण संख्येचा दर कमी , पहिली ते चौथीची शाळाही उघडायला हरकरत – राजेश टोपे
मास्क वापरणं देखील वापरणं गरजेचं आहे. ओमिक्रॉनची लागण होण्याची गती सध्याच्या व्हेरीयंट पेक्षा ५ पटीने मोठी आहे असेही ते म्हणाले. यापुढे केंद्राने सांगितलेल्या १३ देशातून येणाऱ्या प्रवाशांना थेट विमानतळावर कवारंटाईन केलं जाणार असून RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय विमान प्रवास करता येणार नाही असाही निर्णय घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
औरंगाबाद,मुंबई, नागपूर पुणे या विमानतळावर देखील प्रवासांसाठी RTPCR टेस्ट घेतल्या जातील असंही टोपे यांनी सांगितलं.मुंबईहून दिल्लीला जायचं असेल आणि तिथून पुन्हा मुंबईला यायचं असेल तरीही RTPCR चाचणी अहवाल निगेटिव्ह असायला हवा अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.सध्या राज्यात हा व्हेरीयंट नसल्याने सर्व शाळा सुरू करण्यात काहीच अडचणी नाही.