विशेष प्रतिनिधी
मुंबई : पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदतकार्य सुरू केले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना फूड पॅकेट्स व किराणा सामान किट वितरित केले. जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली तसेच खर्डा इथे सुद्धा मदत कार्य आणि धान्यवाटप करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लातूर येथे लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था म. लातूर यांच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ₹1,11,111 देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
मुंबई येथे ओंकार महिला ग्राहक सहकारी संस्था मर्यादित यांच्यावतीने आमदार चित्रा वाघ यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ₹1,00,001 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
जय श्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी एक महिन्याचा पगार अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला देण्याचे आधीच जाहीर केले आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी देखील आपला सहा महिन्यांचा पगार पूर्वग्रस्तांना देण्याचे जाहीर केले.
RSS, for the victims of heavy rains in Maharashtra; Huge help also to the Chief Minister’s Fund
महत्वाच्या बातम्या
- India Drone : ऑक्टोबरमध्ये भारताचा ड्रोन- काउंटर-ड्रोन सराव; एअर मार्शल म्हणाले- पाकिस्तान आपल्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतोय
- Karunanidhi : करुणानिधी यांच्या पुतळ्याच्या स्थापनेला सर्वोच्च स्थगिती; राजकारण्यांचा गौरव करण्यासाठी सार्वजनिक पैशाचा वापर करू नका
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- मानहानी गुन्ह्याच्या श्रेणीतून काढून टाकावी; जेएनयूच्या माजी प्राध्यापकांना नोटीस
- Bangladesh : न्यूयॉर्कमध्ये बांगलादेशी विद्यार्थी नेत्यावर अंडी फेकली; हसीनांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दहशतवादी म्हटले