विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. या घोटाळ्याची तपशीलवार माहिती अण्णा हजारे यांनी पत्रामध्ये लिहिली आहे. Rs 25,000 crore scam in sale of co-operative sugar factories; Anna’s letter to Amit Shah demanding inquiry !!
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा हजारे यांचा आरोप आहे. याची चौकशी आता केंद्रीय सहकार मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.
- ६४ साखर कारखान्यांची यादी समोर ठेवून अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखाना हा प्रकरणाबाबत मौन सोडले
महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांनी आपल्या भाग भांडवल आणि जमिनी देऊन उभे केलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेतले आहेत. त्यातून अंदाजे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सहकार क्षेत्र मोडीत काढून खासगीकरण वाढीला लावण्याचा हा प्रकार असून त्याची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी हजारे यांनी पत्रातून केली आहे. नवीन सहकारी साखर कारखान्यांच्या स्थापनेसाठी इरादा पत्र केंद्र सरकारच्या अख्यात्यारीतील विविध विभागांतर्फे दिले जाते. राज्याच्या ऊस उत्पादनाच्या मर्यादेपलीकडे साखर कारखाने उभारण्याची परवानगी देण्यातही पूर्वीपासूनच केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही मोठी चूक केल्याचा आरोपही हजारे यांनी केला आहे.
कोणताही राजकीय दबाव आणि हस्तक्षेपाशिवाय सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री प्रकरणांची नि:ष्पक्ष चौकशी केली गेली तर त्यातून हे नक्की स्पष्ट होईल की, प्रमुख पदांवर बसलेले निवडक राजकारणी आणि अधिकारी हे साखर कारखाने, त्यातील सार्वजनिक मालमत्ता हडप करण्यासाठी, आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नियम आणि कायदे कसे मोडीत काढू शकतात. त्याचबरोबर सहकार क्षेत्र मोडीत काढून खासगीकरणाला कसा वाव दिला जातो हे दिसून येईल, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती नेमून या घोटाळ्याची तातडीने चौकशी करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पारदर्शक व चांगले क्षेत्र बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रथमच मंत्रालयांतर्गत स्वतंत्र सहकार विभाग निर्माण केला आहे असे आम्हाला वाटते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विक्रीतील घोटाळ्यातील या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केल्यास केंद्र सरकारकडून एक चांगले उदाहरण निर्माण होईल.
– सहकार काढला मोडीत
साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आर्थिक मागणी करणारा एकही प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला नाही. याचे कारण चुकीचे व्यवस्थापन हेच होते. हे अनवधानाने झाले नव्हते तर पूर्वनियोजित होते. कारण राज्य सरकारमधील लोक, आर्थिक संस्थांमधील प्रमुख लोक आणि साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावरील लोक या सर्वांचे संगनमत होते. आपले खिसे भरण्यासाठी सर्वांनी मिळून सहकार क्षेत्र मोडीत काढले. जे सहकारी कारखाने खासगी संस्थांकडून कवडीमोल भावाने खरेदी केले गेले, त्या व्यवहाराची चौकशी केली तर, बहुतांश कारखाने अप्रत्यक्षपणे राजकारण्यांनी कट रचून खरेदी केल्याचे उघड होईल, असेही हजारे यांनी म्हटले आहे.
Rs 25,000 crore scam in sale of co-operative sugar factories; Anna’s letter to Amit Shah demanding inquiry !!
महत्त्वाच्या बातम्या
- सोनिया गांधी, राहुल गांधींनी बाळासाहेबांना अभिवादनाचं साधं ट्वीटही केलं नाही, तरीही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता – देवेंद्र फडणवीस
- तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
- ज्याची बायको पळते त्याचे नाव मोदी ठरते; पुन्हा घसरली नानांची जीभ!!
- अवकाळी पावसामुळं हुडहुडी वाढणार थंडीचा परिणाम राज्यातही दिसणार
- औरंगाबादमध्ये धक्कादायक घटना, मोबाईलमध्ये बाय बाय स्टेटस ठेवत विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या