• Download App
    पोलिसांना घरांसाठी 1768.08 कोटी मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय

    पोलिसांना घरांसाठी 1768.08 कोटी मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पोलिसांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. यापैकी एक निर्णय पोलिसांना घरे देण्याचा होता. पण महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात पोलिसांना घरे बांधणीसाठी सवलती देण्याचा निर्णय बंद केला होता.

    पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आपला जुना निर्णय पुन्हा एकदा लागू केला. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

    – देवेंद्र फडणवीसांचे ट्विट असे :

    जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्याने कार्यरत आपल्या पोलिसांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी प्रारंभीपासून मी आग्रही राहिलो आहे. त्यामुळेच 2014 ते 2019 या काळात मोठ्या संख्येने पोलिसांना घरांसाठी व्याजसवलत अनुदान योजना राबविण्यात आली. महाविकास आघाडीच्या काळात ती योजना बंद केली गेली होती. पण नंतर पुन्हा आम्ही ती योजना सुरु केली.
    आज मला सांगताना आनंद होतो की, आमच्या 5459 पोलिसांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम म्हणून 1768.08 कोटी रुपयांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या या प्रस्तावांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

    Rs 1768.08 crore sanctioned for police houses; Fadnavis government’s decision

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Tirupati Balaji : संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी; 11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही घेतले दर्शन

    Sana Malik : सना मलिक यांचे विधान वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही; सुनील तटकरेंकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

    Pritam Munde : प्रीतम मुंडे म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलू शकतं, तर बीडमध्ये का नाही? आता ‘शतप्रतिशत भाजप’ हवा