• Download App
    रोहित पवारांचा सवाल ; म्हणाले - अनिल देशमुखांच्या अटकेची कारवाई दुर्दैवी, परमबीर सिंग जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ? । Rohit Pawar's question; Said - Anil Deshmukh's arrest is unfortunate, if Parambir Singh has gone abroad, who will support him?

    रोहित पवारांचा सवाल ; म्हणाले – अनिल देशमुखांच्या अटकेची कारवाई दुर्दैवी, परमबीर सिंग जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ?

    देशमुख यांना मंगळवारी ( आज ) सकाळी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. देशमुख यांना कोठडीत ठेवण्यासाठी एजन्सी न्यायालयाची परवानगी घेणार आहे. Rohit Pawar’s question; Said – Anil Deshmukh’s arrest is unfortunate, if Parambir Singh has gone abroad, who will support him?


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : १०० कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केलीय.अनिल देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं हेच मुळात दुर्देवी आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

    ईडीने अनिल देशमुख यांची १२ तास चौकशी केली.एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख या प्रकरणाशी संबंधित प्रश्नांबाबत टाळाटाळ करत होते.देशमुख यांना मंगळवारी ( आज ) सकाळी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. देशमुख यांना कोठडीत ठेवण्यासाठी एजन्सी न्यायालयाची परवानगी घेणार आहे.



    देशमुख सोमवारी रात्री ११.४० च्या सुमारास दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर ईडीचे सहायक संचालक तसीन सुलतान आणि त्यांच्या टीमने देशमुख यांची सतत चौकशी केली.रोहित पवार यांना या प्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भाजप आणि परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केला.

    अनिल देशमुखांना अटक होणं दुर्दैवी

    अनिल देशमुख चौकशीत सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं दुर्दैवी आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे? असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी विचारला.

    Rohit Pawar’s question; Said – Anil Deshmukh’s arrest is unfortunate, if Parambir Singh has gone abroad, who will support him?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस