• Download App
    |महाराष्ट्रातल्या या राजकीय बंडाबाबत रोहित पवार ची 'ती 'कविता चर्चेत Rohit Pawar's poem 'Ti' is in discussion about this political rebellion in Maharashtra

    महाराष्ट्रातल्या या राजकीय बंडाबाबत रोहित पवार ची ‘ती ‘कविता चर्चेत

    कविता आणि विशेष फोटो पोस्ट करत व्यक्त केल्या भावना.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : दोन जुलै रोजी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात जात भाजपाशी हात मिळवणे केली आणि आपल्या ती आमदारांसोबत राजभवनातून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.Rohit Pawar’s poem ‘Ti’ is in discussion about this political rebellion in Maharashtra

    आयुष्यभर ज्या भाजप आणि शिवसेना या पक्षांची संघर्ष करत आज त्यांच्याशीच हात मिळवणी केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले एक अजित पवार गट आणि दुसरा शरद पवार गट आजचा पक्ष फुटीचा प्रकार आहे.



    या बंडखोरीनंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर आता टीका सुरू झाली असून त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज खोचक ट्वीट केलं आहे.रोहित पवारांनी केलेल्या खोचक ट्वीटमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या नकाशाच्या मध्ये शरद पवारांचा फोटो लावण्यात आला असून त्यांच्याभोवती काही लोक उभे असल्याचं दिसत आहे. या नकाशाच्या बाहेरच्या बाजूला चार कुत्रे भुंकत असल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

    रोहित पवारांनी या ट्वीटमध्ये एक कविता पोस्ट केली आहे. त्यातून सध्याच्या राजकीय स्थितीवर त्यांनी भाष्य केलं आहे.

    आज या दारात… उद्या त्या दारात…
    पण एक दिवस लोकांकडं जावंच लागेल
    मग लोकांना काय सांगणार?
    तोंड कसं दाखवणार?
    काल तर कडवा विरोध होता..
    मग आज अचानक गळ्यात गळा कसा?
    तो कोणता गळ आहे…
    ज्या गळाला लागला मासा!
    तुमच्या या चिखलात आम्ही का चालायचं?
    रोजचीच चिखलफेक बघत का बसायचं?
    अरे कुठं गेली तत्व अन् कुठे गेला विचार?
    किती दिवस आम्ही हेच ऐकायचं?
    जगण्याची, विचारांची बदलत चाललीय भाषा..
    आता कुणाकडून करायची जनतेने आशा?
    भरवशाच्या म्हशीलाच झालाय टोणगा..
    कोणता पक्ष… कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..
    इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा..
    कालची भाषा एक होती… आज भलतंच बरळत आहेत…
    स्वार्थासाठी अनेकजण दात खाऊन पळत आहेत.
    कुठेय आपला तो सुसंस्कृत महाराष्ट्र… अन् कुठेय परंपरा?
    निर्लज्जपणाचा झाला कळस…
    तुम्हाला येत नाही याची किळस?
    मत ज्यांची घ्यायची… त्यांचीच चेष्टा करायची
    ही कोणती रित?
    ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली..
    ती देशाला विचार देणारी पिढी आज कुठे हरवली?
    शिव-शाहू-फुले-आंबेडकर…
    तुम्ही महाराष्ट्र घडवला…
    तुमच्या पुरोगामी विचारांच रोपटं इथं रुजवलं..
    पण आज याच रोपट्यावर होतेय का विखारी पावसाचं सिंचन?
    हे होत असेल तर रोखायचं कुणी?
    विष पसरवणाऱ्याला थोपवायचं कुणी?
    त्यासाठी साहेब….
    लोकहिताचं शस्त्र तर आहेच तुमच्या हाती
    आता तुम्हीच उठा…
    अन मैदानात उतरा…
    शेकडो… हजारो… लाखो… करोडो हात देतील तुम्हाला साथ..
    त्यात माझेही असतील दोन हात..
    अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.

    Rohit Pawar’s poem ‘Ti’ is in discussion about this political rebellion in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार

    Icon News Hub