• Download App
    Rohit Pawar रोहित पवारांच्या आरोपांची प्रफुल्ल पटेलांकडून दखलही नाही; "महाराष्ट्राचा पप्पू" म्हणून अनिल पाटलांनीच दिले उत्तर!!

    रोहित पवारांच्या आरोपांची प्रफुल्ल पटेलांकडून दखलही नाही; “महाराष्ट्राचा पप्पू” म्हणून अनिल पाटलांनीच दिले उत्तर!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांनी केलेल्या आरोपांची प्रफुल्ल पटेल यांनी साधी दखलही घेतली नाही. उलट रोहित पवारांना “महाराष्ट्राचा पप्पू” असे म्हणून अनिल भाईदास पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

    प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणात खोडा घातल्याने रोहित पवार चिडले आणि त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना अजित पवारांच्या विमान अपघातात गोवायचा “डाव” खेळला. पण प्रफुल्ल पटेल यांनी तो डाव वेळीच ओळखून त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. रोहित पवारांनी आधी सोशल मीडियावर पोस्ट लिहून प्रफुल्ल पटेल यांना टार्गेट केले.



    त्यानंतर आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन चंद्राबाबू नायडू, प्रफुल्ल पटेल आणि विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू या तिघांनाही टार्गेट केले. त्याच्या आधी रोहित पवारांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना भेटून निवेदन दिले. त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीत लक्ष घालायची मागणी केली.

    – अनिल भाईदास पाटलांचे उत्तर

    पण यांच्यापैकी कुणीही रोहित पवारांच्या आरोपांची दखलही घेतली नाही. रोहित पवारांच्या आव्हानापुढे झुकून प्रफुल्ल पटेल यांनी बिलकुल पत्रकार परिषद घेतली नाही. त्याउलट प्रफुल्ल पटेल यांच्या ऐवजी महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी रोहित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. रोहित पवार सांगतात त्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल हे रोहित सिंगच्या लग्नाला राजस्थानला हजरच नव्हते. रोहित पवार यांनी उगाचच इकडे तिकडे न जाता त्यांच्याकडे असलेले पुरावे तपास संस्थांकडे द्यावेत. उगाच महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, असे अनिल भाईदास पाटील म्हणाले.

    यापूर्वी अनिल भाईदास पाटील यांनीच रोहित पवारांनी छिचोरे धंदे बंद करावेत. अजित पवारांचे राष्ट्रवादी ताब्यात घ्यायचा त्यांचा डाव उधळला गेल्यानेच ते इकडे तिकडे फिरून पत्रकार परिषदा घेत आहेत, ट्वीट करत आहेत, असा आरोप केला होता. त्या पाठोपाठ आज अनिल पाटलांनीच रोहित पवारांना “महाराष्ट्राचा पप्पू” होऊ नये म्हणून शरसंधान साधले.

    Rohit Pawar targets prafull Patel, but he ignores, Anil Patil targets Rohit as Maharashtra Pappu Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shastrinagar : शास्त्रीनगर रुग्णालय मारहाण प्रकरण:शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक, विरोधकांच्या दबावानंतर अखेर कारवाई

    मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून दोन कट्टर पवार विरोधक आमने – सामने!!

    Maharashtra Monsoon : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पालघरला ‘रेड’ तर मुंबईसह कोकणाला ‘ऑरेंज’ अलर्ट