• Download App
    Rohit Pawar Clash Police Ajit Pawar Crash FIR Refusal VIDEOS रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद] अजितदादांच्या अपघाताप्रकरणी DGCA, VSR वर गुन्हा दाखल करण्यास नकार, आता बारामतीत FIR दाखल करणार

    Rohit Pawar : रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद] अजितदादांच्या अपघाताप्रकरणी DGCA, VSR वर गुन्हा दाखल करण्यास नकार, आता बारामतीत FIR दाखल करणार

    Rohit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Rohit Pawar अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बुधवारी रोहित पवारांचा ‘एफआयआर’ दाखल करून घेतला नाही. कोणाच्या तरी पाठिंब्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांची मग्रुरी सुरू आहे. अजितदादा प्रकरणी आमदारांचे असे होत असेल, तर इतरांची काय, असा सवालही रोहित पवार यांनी केला.Rohit Pawar

    रोहित पवार, अमोट मिटकरी यांच्यासह अजित दादां आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, हा एफआयआर पोलिसांनी दाखल करून घेतला नाही.Rohit Pawar



    पोलिसांसोबत झाली बाचाबाची

    रोहित पवार म्हणाले की, ‘सुरुवातीला आमचा वादविवाद झाला. मात्र, त्यांनी लॅपटॉप आणला. माझं स्टेटमेंट टाइप करायला सुरुवात आली. मात्र, एक बडे पोलिस अधिकारी आले. त्यांनी त्यांनी एफआयआर करण्यापासून थांबवलं. त्यांनी आम्हाला का थांबवलं? या पोलिस अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला?, असा प्रश्न असून आमचा संशय बळावत चालला आहे. आम्हाला राज्य सरकारनं आणलेल्या नव्या कायद्यानुसार एफआयर दाखल करण्याचा अधिकार आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘आता उद्या सकाळी दहा वाजता बारामतीमध्ये ‘एफआयआर’ दाखल करायचा प्रयत्न करणार आहोत. ती बिल्डिंग दादांनी बांधली आहे. तिथं नाही झालं, तर न्यायालयात जाऊ. ती बिल्डींगही दादांनी बांधलीय.

    आमदारांची अशी अवस्था

    रोहित पवार म्हणाले की, ‘विखे-पाटील, आशिष शेलार, साताऱ्याचे मंत्री, त्यांचे ट्रोलर ट्रोल करतात. आज पोलिस एफआयआर दाखल करून घेत नाहीत. कुणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय पोलिस अधिकाऱ्यांना अशी मग्रुरी येत नाही. लाखो लोकांच्या आमदारांची अशी अवस्था असेल, तर इतरांचे काय? कोण अडथळे आणत आहेत, कोण नेते आहेत, बघणार,’ असे रोहित पवार म्हणाले. मात्र, मुंबई पोलिसांनी आपण रोहित पवारांनी दिलेली तक्रार स्वीकारली असून, त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

    पोलिस कुणाच्या दबावाखाली?

    राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे आणि आमच्याकडे या प्रकरणात घातपात झाल्याचे स्पष्ट पुरावे असतानाही पोलिस अद्याप एफआयआर (FIR) दाखल का करत नाहीत? असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला आहे. या दुर्घटनेमागे केवळ तांत्रिक बिघाड नसून घातपाताचा संशय बळावणारे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. वारंवार मागणी करूनही आणि पुरावे देऊनही पोलिस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ का करत आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत जर पोलिस इतकी दिरंगाई करत असतील, तर सामान्य जनतेला न्याय कसा मिळणार? व्हीएसआर’ (VSR) या विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे. तपासाची दिशा भरकटवून कंपनीला क्लीन चिट देण्याचा घाट घातला जात असल्याचा दावा त्यांनी केला. पोलिस नक्की कोणाच्या दबावाखाली आहेत आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे जनतेला समजले पाहिजे.

    Rohit Pawar Clash Police Ajit Pawar Crash FIR Refusal VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार रिंगणात; पक्षाच्या कोअर कमिटीचे मोठे निर्णय

    Supriya Sule : शरद पवार यांच्या राज्यसभेसाठी सुप्रिया सुळेंची संजय राऊतांशी चर्चा

    ‘Supreme Court : न्यायिक भ्रष्टाचार’ प्रकरण असलेल्या NCERT पुस्तकाच्या विक्रीवर बंदी; CJI म्हणाले होते- न्यायपालिकेला बदनाम करण्याची परवानगी कोणालाही नाही