विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Pawar महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मतदार यादी तसेच मतचोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर तसेच निवडणूक आयोगावर टीका केली होती. यावेळी प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी स्क्रीनवर मतदारांची खोटी नावे टाकण्यात आल्याचे सांगत थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या नावे देखील आधार कार्ड असल्याचे दाखवले.Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सर्व नेते व त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे निवडणूक आयोगाकडे गेले होते. जी काही यादी आहे त्यावर आमचा आक्षेप आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा काढला होता. आता तुम्हाला यातील काही तांत्रिक बाबी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 2024 च्या लोकसभेचा जो काही निकाल एनडीएच्या विरोधात लागला होता. केंद्रात सत्ता आणण्यासाठी त्यांना बरीच समीकरणे जुळवावी लागली होती. मग महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी त्यांनी खोट्या मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप पवारांनी केला.Rohit Pawar
- नको नको ते खाल्ले, म्हणून कंबरडे मोडले आणि आता हंबरडा फोडू लागले; एकनाथ शिंदेंचा उद्धव सेनेवर निशाणा
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघात लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 या 6 महिन्यांच्या कालावधीत एकूण 14 हजार 113 मतदार वाढले. त्यानंतर 31 ऑगस्ट 2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रति महिना 4891 मतदार वाढले. त्यामुळे निवडणूक आयोग लोकशाहीला मारते की काय असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने आधार कार्ड
यावेळी रोहित पवारांनी प्रात्यक्षिक दाखवत मतदारसंघातील पत्ता टाकला, यात त्यांनी ‘पांढरा बंगला’ असा कर्जत मधला पत्ता टाकायला सांगितला, त्यानंतर संपूर्ण तपशील भरायला सांगितला. तारीख 1825 मधली टाकली. त्यानंतर त्यांनी फेटा असलेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो अपलोड केला आणि लगेच डोनाल्ड तात्या ट्रम्प या नावाने संपूर्ण आधार कार्डच तयार झालेले प्रात्यक्षिक स्क्रीनवर दाखवले. यावरून खोटी माहिती कशी टाकली जाते ते रोहित पवार यांनी दाखवले.
पिंपरीत 54000 मतदारांचा घोळ
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, शिरूर विधानसभा मतदारसंघाचे 10230 नावे आहेत. वडगाव शेरीत 11064, खडकवासला येथून 12330, पर्वती मतदारसंघात 8238, हडपसर मतदारसंघात 12798 असे 54000 नावे वाढवली आहेत. आमचे कार्यकर्ते तिथे माणसे शोधायला गेली. पण एक सुद्धा माणूस तिथे सापडली नाहीत. अशोक पवार यांनी जसे सांगितले की, बसने तिथे लोक आणली. तिथे मतदान करुन घेतल्यानंतर परत त्यांना बसने पाठवले. पैसे देऊन लोकांना मतदानासाठी आणले. मतदान करुन घेतले आणि परत त्यांच्या मतदारसंघात पाठवले. मी पिंपरीचे उदाहरण दाखवले. तिथे 54000 मतदारांचा घोळ झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. या स्वायत्ता संस्थेचे इंटरनेट आणि त्यांची वेबसाईट सांभाळण्याची जबाबदारी देवांग दवे नावाच्या व्यक्तीला निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सर्व माहिती असते. दवे भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवे यांच्याकडे सर्व माहिती होती. यादीत कुणाचे नाव घ्यायचे आणि कुणाचे नाव काढायचे हे दवेंनी त्या त्या मतदारसंघाच्या आमदारांना विश्वासात घेऊन केले, असे आमचे ठाम मत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
मतदार यादीचे विश्लेषण आम्हाला दिले पाहिजे
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, एवढी मोठी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल, आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला सांगितले जाते की देत नाही. आमच्या नेत्यांना सांगितले जाते की, ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. मतदार यादीचे विश्लेषण आम्हाला दिले पाहिजे. अचानक वाढलेले मतदार होते कुठले आणि कसे आले याची माहिती आम्ही मागवली आहे. आम्हाला लेखी स्वरुपात स्ष्टपणे माहिती दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
डिजीटल मतदार याद्या देण्यात याव्यात. बीएलोच्या डायरी नोंदी कशा झाल्या याची माहिती मिळायला हवी. तसेच येणाऱ्या निवडणुकीत ते कसे होणार आहे, याची देखील माहिती आम्हाला हवी आहे. मतदानाच्या दिवसाचे सीसीटीव्ही हवे आहेत. शेवटच्या तासात 68 लाख लोकांनी मतदान केले. मग ते कोण होते ते आम्हाला बघायचे आहे, असेही यावेळी रोहित पवार यांनी म्हटले आहे.
विधानसभेत सर्वात जास्त मतदार पनवेलमध्ये वाढले
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या काळात सर्वात जास्त मतदान हे पनवेलमध्ये वाढले आहे. इथे 65000 मतदार वाढले आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये 57000 मतदार वाढले. भोसरीत 56000, मीरा भाईंदर 53000, नालासोपारा 50000, चिंचवड 45000, हडपसर 43000 अशा संख्येत सहा महिन्यांत मतदार वाढले आहेत, असा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
NCP MLA Rohit Pawar Alleges Fake Voter Registration in Maharashtra to Secure Power; Presents ‘Aadhaar Card’ in Donald Trump’s Name as Proof of Scam
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले- कुणी मिमिक्री केल्याने अंगाला भोकं पडत नाहीत, मी काम करणारा माणूस!
- नको नको ते खाल्ले, म्हणून कंबरडे मोडले आणि आता हंबरडा फोडू लागले; एकनाथ शिंदेंचा उद्धव सेनेवर निशाणा
- Supreme Court : दिल्ली-NCRमध्ये काही अटींसह17 ते 21 ऑक्टोबरपर्यंत ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी; CJI म्हणाले- संतुलित दृष्टिकोन हवा
- Shehbaz Sharif : ट्रम्प यांचे कौतुक केल्याने पाक PM देशातच ट्रोल; लोक म्हणाले- शरीफ यांना खुशामतीबद्दल नोबेल द्या, आपले नेते इतके चापलूस का?