• Download App
    रोहित पवार ईडी चौकशी : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानशी आर्थिक संबंध, मनी लॉड्रिंगचा संशय!!|Rohit Pawar ED investigation: Financial relationship with accused in PMC Bank scam Rakesh Wadhawan, suspicion of money laundering!!

    रोहित पवार ईडी चौकशी : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानशी आर्थिक संबंध, मनी लॉड्रिंगचा संशय!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार हे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला सप्त वसुली संचालनालय अर्थात ईडीने सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, या बातम्या माध्यमांनी दिल्या.Rohit Pawar ED investigation: Financial relationship with accused in PMC Bank scam Rakesh Wadhawan, suspicion of money laundering!!

    पण रोहित पवार आणि त्यांचे वडील राजेंद्र पवार यांचे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याच्याशी आर्थिक संबंध होते, हे संबंधित बातम्यांमध्ये तळात म्हटले आहे. रोहित पवार आणि राजेंद्र पवार ज्या कंपनीचे संचालक होते त्या कंपनीत राकेश वाधवान आणि इतर चार संचालक होते. रोहित पवार आणि राजेंद्र पवार हे विशिष्ट मुदत संपल्यानंतर त्या संचालक मंडळातून बाहेर पडले आणि बाकीचे 4 संचालकही हळूहळू कंपनीतून बाहेर पडले.



    ग्रीन एकर लिमिटेड

    ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 2006 ते 2012 पर्यंत रोहित पवार हे या कंपनीचे संचालक होते. तसेच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील 2006 ते 2009 पर्यंत या ग्रीन एकर कंपनीचे संचालक होते. त्याचबरोबर या कंपनीत असणारे इतर सर्व सदस्य हे सध्या तुरुंगात असलेल्या एचडीआयएल कंपनीचे मालक राकेश वाधवान याच्यासोबत इतर कंपन्यांमध्ये पार्टनर देखील आहेत आणि याचदृष्टीने ईडीचा तपास सुरू आहे.

    यामध्ये बाबासाहेब सुर्यवंशी, लखमिंदर सिंग, धोंडू जडयार अरविंद पाटील यांच्या नावांचा सामावेश आहे. ज्यावेळी रोहित पवार ग्रीन एकर रिसॉर्ट्स अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून बाहेर पडले. त्यानंतर हळूहळू इतर 4 सदस्य देखील त्या कंपनीतून बाहेर पडले. त्यामुळे आता ईडीने या संपूर्ण प्रकरणात रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी असलेले संबंध पाहता तपासला सुरुवात केली आहे. ईडी आपल्या तपासात या कंपनीचा फॉरेन्सिक ऑडिट, शेअर धारक आणि संचालक यांची अर्थिक देवाण घेवाण याची बारकाईने तपास करणार आहे. ईडीला यात मनी लॉड्रिंग तर झाले नाही ना याचा तपास करायचा आहे.

    राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राजकीय सूडापोटी रोहित पवार यांचे नाव अडकवण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तपासे म्हणाले, ईडीचा वापर हा राजकीय विरोधाकांसाठी केला जात आहे. कारण नसताना रोहित पवारांचे नाव घेण्यात आल्या आहेत. ग्रीन एकर कंपनीचे संचालक देखील नाहीत. महागाई, बेरोजगारीवर भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीचे जे नेते बोलत आहे त्यांना ईडीच्या फेऱ्यात अडकवले जात आहे.

    Rohit Pawar ED investigation: Financial relationship with accused in PMC Bank scam Rakesh Wadhawan, suspicion of money laundering!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस