क्रांतीने नवाब मलिक यांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार क्रांतीला पाठींबा देत पुढे आले आहेत.Revolution really amazes me ..; Actor Aroh Welankar tweeted in support of Kranti Redkar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्मदाखला आणि पहिल्या लग्नाचा फोटो पोस्ट करत त्यांच्या खासगी आयुष्यावरही निशाणा साधण्यास सुरुवात केली होती. मात्र क्रांतीने “आज काल बायका पण असं वागत नाहीत. हे किचनमधील पॉलिटिक्स, चोमडेपणा केल्यासारखं आहे.” असं म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान क्रांतीने तिला महाराष्ट्रासह देशभरातून समर्थनाचे मेसेज येत आहेत असं म्हंटलं असलं तरी अद्याप एकही मराठी अद्याप क्रांतीच्या पाठिंब्यासाठी पुढे का येत नाही अशा चर्चा सुरु होत्या.
क्रांतीने नवाब मलिक यांना दिलेल्या प्रत्युत्तरानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार क्रांतीला पाठींबा देत पुढे आले आहेत. अभिनेत्री मेघा धाडे हिने क्रांतीला पाठींबा दिला. आता मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर यानेही क्रांतीला पाठींबा जाहीर केला आहे.अशातच अभिनेता आरोह वेलणकर यांनी हाच प्रश्न उपस्थित करत क्रांतीला सोशल मीडियावरून जाहीर पाठींबा दिला आहे.
आरोह वेलणकरने एक ट्वीट केलं आहे. यात तो म्हणाला, “क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील एकही मित्र तुझ्या पाठींब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही. मला माहित आहे आपण खूप चांगले मित्र नाही फक्त ओळखीचे आहोत. मात्र तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे.” असं म्हणत आरोहने क्रांतीला जाहीर पाठिंबा दिला. क्रांतीला सोशल मीडियावरून पुढाकार घेत पाठिंबा देणारा आरोह पहिला मराठी अभिनेता आहे.
Revolution really amazes me ..; Actor Aroh Welankar tweeted in support of Kranti Redkar
महत्त्वाच्या बातम्या
- … अन्यथा कृषी कायदे आणि बीएसएफच्या अधिकाराची हद्द पंजाब विधानसभा रद्द करेल; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा केंद्राला इशारा
- फेसबुक सीईओ झुकेरबर्ग आणि पत्नी प्रिसिला चानवर माजी कर्मचार्यांनी केला खटला दाखल, घरात गैरवर्तनाचा आरोप
- आम्ही पिढ्यान पिढ्या हिंदू दलित, मग माझा मुलगा मुस्लिम कसा?; ज्ञानदेव वानखेडे यांचे नवाब मलिक यांना प्रत्युत्तर
- नवाब मलिक तुम्हाला नियती माफ करणार नाही , निलेश राणेंनी साधला निशाणा