• Download App
    किरीट सोमय्यांसोबत दरेकरांवर सूडबुध्दी, मुंबई बँक प्रकरणात पुन्हा चौकशी|Revenge on Darekar along with Kirit Somaiya, re-investigation in Mumbai Bank case

    किरीट सोमय्यांसोबत दरेकरांवर सूडबुध्दी, मुंबई बँक प्रकरणात पुन्हा चौकशी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यास पोलीसांनी सुरूवात केली आहे. किरीट सोमय्या यांच्याबरोबरच मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सोमवारी पुन्हा चौकशी झाली. ते कोणकोणत्या संस्थांमध्ये नेतृत्व करतात याबाबत माहिती घेतली गेली.Revenge on Darekar along with Kirit Somaiya, re-investigation in Mumbai Bank case

    तर पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील मुद्द्यांऐवजी दुसºया मुद्द्यांवरून प्रश्न विचारले, असा दावा दरेकरांनी केला.पोलिसांनी दरेकरांना समन्स बजावत दुसºयांदा चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार, सकाळी दरेकर पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.



    पोलीस तेच मुद्दे पुन्हा उपस्थित करून माहिती घेत होते. मी कुठे कुठे नेतृत्व करतो? याची माहिती घेतली जाते. व्यक्तिकेंद्रित छळ करण्याची भूमिका दिसत आहे. आम्ही लोकशाही मानणारे आहोत. ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवसापासून आम्ही सहकार्य करीत आहोत.

    पोलीस मला जेव्हा बोलावतील तेव्हा मी उपस्थित राहीन. तरीही यांना पोलीस कोठडी कशासाठी हवी आहे?, असा सवाल दरेकरांनी केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीत, गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते. यापूर्वी ४ एप्रिल रोजी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला होता.

    Revenge on Darekar along with Kirit Somaiya, re-investigation in Mumbai Bank case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !